महिलानीं स्वावलंबी व्हावे – शिल्पा बांते (वनामी फाऊंडेसन जि.अध्यक्षा)
गोंदिया ( देवरी ) : मासुलकसा येथील जिल्हापरिषद शाळेच्या प्रानंगनात गावातील नागरीक व प्रहार जन पक्षाचे तालुका अध्यक्ष ईश्वर कोल्हारे यांच्या माध्यमाने 8 मार्च जागतीक महिला दिन मोठ्या उत्साहात मासुलकसा गावात साजरा करन्यात आला. त्यात उत्तम कामगिरी करणाच्या स्वयं सहायता गटांचे सत्कार’ करण्यात आले. विशेषता मासुलकसा गावात महिला गटाच्या माध्यमाने महिलानां रोजगार उपलब्ध करुन देण्यात आले असुन विविध रोजगाराभिमुख उपक्रम मासुलकसा गावातील महिला राबवीत आहे. उपक्रम राबविण्यामागचा उद्देश हा महिला फक्त बचती पुरते मर्यादित न राहता व्यवसायाभिमुख प्रशिक्षित करून रोजगार निर्मितीद्वारे त्यांचे जीवनमान उंचावणे असल्याचे कार्यक्रमा प्रसंगी सांगन्यात आले. कार्यक्रमाच्या अधक्ष्य म्हणुन गावातील प्रतिष्ठीत नागरीक माधवराव बनसोड तर उदघाटक म्हणुन सौ. गुंवनता कवास सरपंच ग्रामंचायत शेरपार हे होते.
महिला दिनाच्या कार्यक्रमात मासुलकसा ग्रामपंचायत मधील शेकडो महिलांनी उत्स्फू्तपणे सहभाग नोंदवला. या प्रसंगी वनामी फाऊन्डेसन गोंदिया जिल्हा अध्यक्षा शिल्पाताई बांते, प्राध्यपीका भुरे मॅडम प्रमुख मार्गदर्शन पाहुने म्हणुन उपस्तीत होत्या तर सहयोगणी मिविम कुरसुंगे मॅडम, भैसारे मॅडम, शिक्षीका प्रतिमा सिंद्राम , साधन व्यक्ती मावीम दिघोरे मॅडम, डिलेश्वरी बनसोड, ममता कोराम , हिरालाल पडोटी, गुलाब मडावी, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. बांन्ते मॅँडम यांनी महिलाना स्वसंरक्षण व स्वावलंबी जीवन जगने संबंधित मार्गदर्शन केले, तर भुरे मॅँडम यांनी अंधश्रद्धा व ग्रामीन भागातील महिलांनी जागृत होऊन रोजगाराभिमुख विषयी माहिती दिली तसेच महिलांसाठी उपयुक्त असणाच्या योजनांबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमा प्रंसगी गावातील महिलानीं पाहुण्याचे पारंपारीक पद्धतीने लेजीमंच्या तालावर स्वागत केले. तर प्रतिमेच्या स्वरुपात असलेल्या महात्मांच्या प्रतिमेला पाहुण्यांच्या हस्ते माल्यार्पन करत कार्यकक्रमाची सुरुवात करन्यात आली. याकार्यक्रमाची प्रस्तावना ईश्वर कोल्हारे , सूत्रसंचालन व आभार शिक्षक प्रवीण सरगर यांनी केले.
