गोंदिया : मा. उच्च न्यायालयाचे आदेशान्वये ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी जनतेमध्ये जनजागृती करुन ऑनलाईन माध्यमातून तक्रारी नोंदविण्याच्या निर्देशाप्रमाणे गोंदिया जिल्हयातील सर्व नागरीकांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की, आवाजाची पातळी अनुज्ञेय पातळीपेक्षा जास्त असल्याचे आढळुन आल्यावर किंवा त्यापासून त्रास होत असल्यास अशा Public Address System (उदाहरणार्थ D.J., लाऊडस्पीकर, ऍम्प्लिफायर, ध्वनी निर्माण करणारे उपकरण ई.) याबाबत व्हॉट्स अँप क्रमांक ९१३००३०५४८ (नियंत्रण कक्ष गोंदिया) व हेल्पलाईन क्रमांक ११२ या क्रमांकावर तात्काळ तक्रार नोंदवावी. जेणेकरुन गोंदिया जिल्हा पोलीस दलाकडून सदर तक्रारीवर तात्काळ दखल घेऊन संबंधीतांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
