देवरी शहरासह तालुक्यात वीज ग्राहकांची संख्या मोठी ! मात्र वीज पुरवठा अपुरा..

सततच्या खंडित वीजपुरवठ्याने नागरिक हैराण…

सातत्याने खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबद्दल देवरी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सायंकाळच्या वेळेस तसेच रात्री-अपरात्री कधीही वीज पुरवठा खंडित होत असल्याने उन्हाळ्याच्या उकाड्यात लोकांचे अतोनात हाल होत आहेत.

गोंदिया ( देवरी )  ; सातत्याने खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबद्दल देवरी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सायंकाळच्या वेळेस तसेच रात्री-अपरात्री कधीही वीज पुरवठा खंडित होत असल्याने उन्हाळ्याच्या उकाड्यात लोकांचे अतोनात हाल होत आहेत. तर महावितरणकडून मात्र वीज पुरवठा खंडित होत असल्याबद्दल उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने नागरिकांच्या संतापात भरच पडत आहे.

देवरी शहरासह तालुक्यात वीज ग्राहकांची संख्या मोठी असून वीज पुरवठा मात्र अपुरा होतो. येथून महावितरणला मिळणारे उत्पन्न पाहता अधिकाधिक चांगली सेवा मिळावी अशी वीज ग्राहकांची अपेक्षा असली तरी  नागरिकांना वीज लोडशेडिंग तसेच अधूनमधून होणाऱ्या इमर्जन्सी लोडशेडिंगचे चटके सहन करावे लागत आहे. घरात राहणाऱ्या महिलांपासून शासकीय कार्यालये, उद्योग-व्यापाऱ्यांना याचा फटका बसत आहे. गेले अनेक वर्षापासुन देवरी शहरात कमी दाबेचा विज पुरवठा होत असुन त्याचा चांगलाच फटका देवरी शहर वाशीयांना बसत आहे.  तसेच दिवसा व रात्री कधीही वेळ पडल्यास देवरी शहरासह तालुक्यातील वीज गायब होत आहे. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये विद्युत विभागासंदर्भात  संतापाची भावना व्यक्त होत आहे. आता तालुक्यातील लोकांनी महावितरणच्या विरोधात रस्त्यावर उतरून तसेच आक्रमक आंदोलन करन्याची तयारी दाखविली आहे. गेले काही दिवसापासुन नियमित खंडित होणारा वीज पुरवठा, इमर्जन्सी लोडशेडिंग यामुळे आता संतापात भर पडत आहे. त्यामुळे  नागरिकांच्या आंदोलनाला विद्युत विभागच भर पाडत आहे.

अवकाळी येत असलेल्या वादळ पाण्याने  काही देखभाल-दुरूस्ती कामासाठी वीज खंडित होते. तसेच MIDC तिल कारखान्यांच्या वाढत्या लोड मुळे देवरी शहरातील विज पुरवठा कमी दाबात  ग्राहकांना विच पुरविल्या जात आहे. तर विद्युत विभागाच्या या गलथानपणाला देवरी शहर वाशी वैतागले आहेत. चिचगड, कन्हाळगाव, शिरपुरबांध, ककोडी अशा भागातही सायंकाळी वीज जात असल्याने लोक वैतागले आहेत. एकीकडे कडक उन्हाळ्याने नागरिकांना घामाच्या धारा निघत असताना या सततच्या विद्युत खंडीतच्या चटक्यांची त्यात भर पडली आहे. वेळीच महावितरणने नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

छत्तीसगढ़ के आसमान पर बिखरेगी तिरंगे की झटा नया रायपुर में सूर्य किरण का रोमांचक एयर शो 5 नवंबर को फाइटर प्लेन मनूवर करते हुए बनाएंगे हार्ट, डायमंड, लूप, ग्रोवर, डान जैसी कई फार्मेशन नौ फाईटर प्लेन आधे घंटे तक आसमान में दिखाएंगे करतब