जनार्धन हेगडकर – चिचगढ पोलिस स्टेशनचे नवीन ठाणेदार म्हणून नियुक्त

देवरी पोलिस उपविभागाअंतर्गत गुन्हेगारी प्रवृत्तींची गय नाही – विवेक पाटिल

गोंदिया , देवरी (चिचगड)  ; चिचगड पोलिस स्टेशनला ठाणेदार म्हणुन सहायय्क पोलिस निरीक्षक जनार्धन हेगडकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.  त्यानीं चिचगड पोलिस्टेनचे कारभार दि. 14 जुन रोजी हाती घेतला आहे.  त्यांच्यासमोर कायदा आणि सुव्यवस्था त्याचबरोबर चिचगड पोलिस्टेसन हद्दीतील गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालून गुन्हेगारी प्रवृत्तींवर धाक निर्माण करण्याचे आव्हान असणार आहे. हेगडकर हे सालेकसा ,नवेगाव पोलिस स्टेशनला कार्यरत राहिले असून त्यांनी तिथे गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालत अवैध जनावरे वाहतुक , जुगार , चोर्‍या, दरोडे लुटमार आदी गुन्ह्यांच्या उकल करत आरोपींना जेरबंद केले आहे. गुन्हेगारांचा व गुन्हेगारी प्रवृत्तीचा बीमोड करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.

नविन आलेल्या अधिकार्‍यांकडून गुन्हेगारी प्रवृत्तींचा बिमोड करण्यासाठी नागरीकांची अपेक्षा वाढली आहे. हेगडकर यांनी नवेगाव व सालेकसा शाखेमध्ये चांगल्या पद्धतीने कारभार केलेला आहे. अनेक गुन्यातील  प्रकरणांमध्ये त्यांनी विशेष तपास करून आरोपींना जेरबंद करण्यामध्ये योगदान दिले आहे.

गुन्हेगारी कृत्य खपवून घेणार नाही -जनार्धन हेगडकर

पोलिस व नागरिक मित्रत्वाचे संबंध असले पाहिजे त्यासाठी प्रयत्न करू. जास्तीत जास्त पोलिसिंग कसे राबवता येईल सोबतच गोंदिया पोलिस अधिक्षक साहेबांच्या आदेशाने “दादालोरा खिडकी योजने” अंतर्गत नवनवे उपक्रम राबवत प्रथम प्राधान्य देण्यात येईल. चिचगड पोलिस्टेसन हद्दीत अवैध जनावरे वाहतुक, जुगार , गांजा विक्री वाहतुक  असले कोणत्याही गुन्हेगाराचे गुन्हेगारी कृत्य खपवून घेतले जाणार नाही. प्रत्येक नागरिकाच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होईल असे कामे चिचगड पोलिसांतर्फे करन्यात येतील , अशी ग्वाही चिचगड पोलिस्टेनला रुजु झालेले ठाणेदार जनार्धन हेगडकर यांनी  मुलाखाती दरम्यान दिली.

देवरी पोलिस उपविभागाअंतर्गत गुन्हेगारी प्रवृत्तींची गय नाही – विवेक पाटिल

कायदा आणि सुव्यवस्था अभेद्य राखण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न केले जात आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसेल व नागरिकांना सुरक्षितता वाटेल. देवरी पोलिस उपविभागाअतंर्ग येत असलेल्या पोलिस्टेसनल औद्योगिक वसाहत व ग्रामीण भागातील गावे पोलिस जोडले गेलेल आहेत. दोन्हींचाही समतोल राखून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारांवर कायद्याचा धाक रहावा. यासाठी कडक कारवाई केली जाईल. गुन्हेगारी प्रवृत्तींची गय केली जाणार नाही, असी माहिती देवरी उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील यांनी सांगीतले आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें