चीचगढ़ पोलिसांची कारवाही : बांधून ठेवलेले 12 जनावर जप्त

कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या 12 जनावरांची चिचगड पोलिसानीं केली सुटका ; गुन्हा दाखल

कत्तलीला घेऊन जाण्यासाठी ककोडी परिसरातल जंगल क्षेत्रातील ठिय्यावर कत्तलिसाठी विकने करीता बांधुन ठेवलेल्या एकूण 12 जनावरांना चिचगड पोलिसांनी जीवनदान देऊन सुटका केली आहे.

गोंदिया , देवरी ( चिचगड ) ; तालुक्याच्या ककोडी जगंल परिसरात कत्तलीला बांधुन ठेवलेल्या एकूण 12 जनावरांना चिचगड पोलिसांनी जीवनदान देऊन सुटका केली आहे. चिचगड पोलिसांना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मालक राधेश्याम अबांदे रा. ककोडी यांच्या विरोधात अवैध जनावरे बांधुन ठेवल्या प्रकर्णी दि. 22 जून 2025 ला फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

सुत्रांतर्फे मिळालेल्या माहितीनुसार चिचगड पोलिसांनी ककोडी येथिल राधेश्याम अंबादे यांनी अवैध बांधुन ठेवलेल्या जनावरांच्या ठिय्यावर छापा टाकला असता पांढऱ्या रंगाच्या 12 जीवंत जनावरे (बैल-गाय) कत्तलीसाठी विक्री करन्याच्या उद्देसाने ककोडी जगंल परिसरातील ठिय्यात बांधलेली होती. सदर जनावरांना कोणत्याही प्रकारच्या चारापाण्याची व औषधोपचाराची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. ती सर्व जनावरे अशक्त व भुकेने व्याकुळ झालेली होती. सदर जनावरांबाबत राधेश्याम अबांदे यास विचारणा केली असता ती जनावरे आमचीच असुन ती कत्तल करण्यासाठी घेवुन जाणार असल्याचे त्यानीं सांगितले.

चिचगड पोलिसानीं सदर व्यक्तीकडुन 12 जनावरे ताब्यात घेत अंदाजे 88 हजार रुपयांचा मुद्दमाल जप्त केला आहे. सदरची कारवाई पोलिस अधिक्षक गोंदिया , उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी यांच्या आदेशाने व चिचगड पोलिस्टेसनचे ठाणेदार जणार्धन हेगडकर यांच्या मार्गदर्शनात पो.उ पनिरीक्षक खासबागे सा.पो.हवा.मारस्कोल्हे पो.हवा.कमलेश शहारे यांनी केली.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें