भंडारा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवार २८ जून रोजी भंडारा जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
२८ जून रोजी दुपारी १२.४५ वाजता एमआयइटी कॉलेज परिसर हेलिपॅड, शहापूर येथे हेलिकॉप्टरने आगमन. तिथून मोटारीने दुपारी १ वाजता खामगाव (जिल्हा भंडारा) येथे भेट व जल पर्यटन प्रकल्पाची पाहणी. त्यानंतर दुपारी १.४५ वाजता रेल्वे मैदान, खात रोड येथील शिवसेना मेळावा व जाहीर सभेस उपस्थित राहून दुपारी ३.१५ वाजता एमआयइटी हेलीपॅड कडे प्रयाण व तिथून ३.४५ वाजता हेलिकॉप्टरने नागपूरकडे प्रयाण करतील.
