लॉयन क्लब ऑफ नागपूर व्हिजन चे विविध समाजोपयोगी उपक्रम.

गोंदिया ( गोठणगाव ) : डॉ. अरुणजी चतुर्वेदी, रत्नाकर चिमोटे, लॉयन क्लब ऑफ नागपूर व्हिजन या नावाजलेल्या स्वयंसेवी संस्थेकडून गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्याअंतर्गत पोलिस मदत केंद्र गोठणगाव येथे आगामी पोलीस भरती ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे, लॉयन क्लब ऑफ नागपूर व्हिजन चे व्हाइस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. अरुणजी चतुर्वेदी, प्रेसिडेंट श्री रत्नाकर चिमोटे, डिस्ट्रिक्ट को- ऑर्डिनेटर श्री अवनीकांत वर्मा, पास्ट प्रेसिडेंट श्री धनंजय ठोंबरे  यांनी प्रत्यक्ष गोठणगाव अश्या आदिवासी, नक्षलग्रस्त भागामध्ये भेट देऊन आगामी पोलिस भरती ची तयारी करणाऱ्या होतकरु व गरजुवंत विद्यार्थ्यांना मोफत रनिंग शूज चे वाटप केले तसेच गरिब परिस्थिती मुळे आर्थिक आव्हानांचा सामना करत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत टी- शर्ट वाटप केले. ज्या विद्यार्थ्यांची खूपच हलाकीची परिस्थिती आहे, जे अभ्यास करण्यासाठी पुस्तके सुद्धा खरेदी करु शकत नाहीत अश्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचा संच पोलिस मदत केंद्र गोठणगाव येथील अभ्यासिकेमधे ठेवण्यात आला. सदर कार्यक्रमातून एकूण 50 च्या वर विद्यार्थी लाभान्वित झाले आहेत. श्री अवनिकांत वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली गोठणगाव येथील आदिवासी विकास हायस्कूल व दीन दयाळ उपाध्याय आश्रम शाळेतील 10 वी च्या विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेऊन ऐकूण 42 विद्यार्थ्यांमधून 8 विद्यार्थ्यांची निवड करुन त्यांना बक्षीस देण्यात आले, तसेच गोठणगाव येथील प्रतीक गेडाम या ट्रान्सजेंडर व घरातील कर्त्या व्यक्तीला रेल्वे अपघातामध्ये आपला एक पाय कायमचा गमवावा लागल्याने व त्याचे उपचार अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात चालू असल्याने तेथे जाऊन त्यास आर्थिक मदत म्हणून 2100 रुपये कॅश देण्यात आले. सदर चे कार्यक्रम पोलिस विभागाच्या मदतीने गोंदिया जिल्हा पोलीस,  “दादालोरा पोलीस खिडकी” योजनेच्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक गोरख भामरे साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे सा. यांचे संकल्पनेतून तसेच मा. उपविभागीय पोलिस अधिकारी श्री विवेक पाटील सा, पोलिस स्टेशन केशोरी चे ठाणेदार श्री. मंगेश काळे सा. यांचे मार्गदर्शनाखाली पार पडले असून, “नक्षलग्रस्त भागातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा गरिबातला गरीब विद्यार्थी सुद्धा स्पर्धेत टिकला पाहिजे, त्याच्या आर्थिक परिस्थीमुळे तो स्पर्धेच्या बाहेर जाणार नाही याची काळजी लॉयन क्लब सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने घेतली जाईल असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी श्री विवेक पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. सदर चा कार्यक्रम  हा पोलीस मदत केंद्र गोठणगाव चे प्रभारी अधिकारी पोलिस उप निरीक्षक गित्ते यांच्या पुढाकाराने तसेच जिल्हा पोलिस चे अंमलदार अंबुले, भोवते, मडावी, थेर, आणि एस.आर.पी.एफ. चे पोउपनि दुर्गाकर व इतर अंमलदार यांच्या मदतीने पार पडला.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

छत्तीसगढ़ के आसमान पर बिखरेगी तिरंगे की झटा नया रायपुर में सूर्य किरण का रोमांचक एयर शो 5 नवंबर को फाइटर प्लेन मनूवर करते हुए बनाएंगे हार्ट, डायमंड, लूप, ग्रोवर, डान जैसी कई फार्मेशन नौ फाईटर प्लेन आधे घंटे तक आसमान में दिखाएंगे करतब