“देवीची आराधना आणि नवरात्रीचा आनंद पावसामुळे थांबू शकत नाही,”….
देवरी शहरात नवरात्रोत्सवाची धूम सुरू असून देवीची आराधना…
गोंदिया ( देवरी ) ; यंदाच्या परतीच्या पावसाने जसे शेतीचे काही अंशी नुकसान होत आहे त्याच प्रमाणे सण उत्सवांवरही पावसाचे सावट आहे. देवरी शहरातील नगरपंचायत क्रिडासंकुलाच्या मैदानात “अ ” क्रॉझ अँकडमी देवरी व माजी सभापती/जिल्हापरीषद सदस्या सौ. सविता पुराम यांच्या तर्फे काल बुधवारी (दि. 24) मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात सुरू झालेल्या गरबा उत्सवात संध्याकाळी पावसाने हजेरी लावल्याने अनेक गरबा रसिकांच्या चेहर्यावर नाराजी दिसुन आली. तर या आयोजीत रास गरबात काही गृपगरबा खेळनार्यांनी बरसणाऱ्या पावसामध्येच गरब्याचा आनंद घेतला. तर येत्या दोन ते तीन दिवस याच पद्धतीने पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आल्याने यंदाच्या नवरात्रीवर पावसाचे सावट असल्याचे चित्र आहे.
दांडिया-गरब्याच्या रंगारंग कार्यक्रमांनी सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. विविध गृहसंकुल, सोसायट्यांमध्ये नागरिक स्वतःहून एकत्र येऊन गरबा व दांडियाचे आयोजन करतात. तर दुसरीकडे, हजारो रुपयांचा खर्च करून “अ ” क्रॉझ अँकडमी , देवरी व माजी सभापती/जि.प.सदस्या सविता पुराम यांच्या तर्फे देवरी शहरातील नगरपंचायत येथिल क्रिडा संकुलाच्या मैदानांवर भव्य दांडिया महोत्सवाचे आयोजन केले गेले. सजावट, प्रचंड रोषणाई, अत्याधुनिक ध्वनीव्यवस्था, नामांकित कलाकारांचा सहभाग यामुळे या कार्यक्रमांना नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. मात्र, आयोजीत या रास गरबा कार्यक्रमावेळीच आलेल्या पावसामुळे आयोजकांसह रसिकांच्या चेहर्यावर नाराजी दिसुन आली. बुधवारी संध्याकाळी देवरी शहरातील नगरपंचायतच्या क्रिडासंकुलातील मैदानात नियोजित गरबा कार्यक्रम सुरू असतानाच पावसाच्या सरींनी धडक दिल्याने नागरिकांची गैरसोय झाली. ज्या मैदानांवर हजारोंची गर्दी उसळायची, त्या मैदानांवर लोक छत्री घेऊ उभे राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही वेळ नृत्यांगण मोकळे राहिले तर काही वेळात वेळ कमी करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे आयोजकांसह गरबा रसिकांचा हिरमोड झाल्याचे पाहायला मिळाले.
“अ ” क्रॉझ अँकडमी , देवरी व गोंदिया जि.प. सदस्या सविता पुराम यांच्या तर्फे हजारो खर्चाने उभारलेले मंडप, आकर्षक सजावट आणि नामांकित कलाकारांचे कार्यक्रम हे या महोत्सवांचे वैशिष्ट्य होते, मात्र पावसामुळे या ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण झाल्याचे दिसून आले. प्रेक्षकांची उपस्थितीही अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याने आयोजकांना निराशा जाणवली. हवामान खात्याने येत्या दोन ते तीन दिवसांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे उर्वरित नवरात्रीही पावसातच साजरी होणार की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे पावसामुळे उत्सवात अडथळे आले तरी, दुसरीकडे भक्तिमय वातावरण, देवीभक्तांचा उत्साह आणि सांस्कृतिक रंगत अजूनही कायम असल्याचे चित्र काल बुधवारला (दि.24) आयोजीत “अ ” क्रॉझ अँकडमी , देवरी च्या डान्स गरबा कार्यक्रमात पहायला मिळाले.
एकूणच, देवरी शहरातील नवरात्रोत्सव यंदा “पावसातला गरबा” म्हणून स्मरणात राहील, हे निश्चित आहे. पावसाच्या सरींसोबत देवीची आराधना आणि गरब्याचे ताल असा अनोखा संगम नागरीक अनुभवत आहेत. तर देवरी नगरपंचायतच्या क्रीडा सकुंलात आयोजीत गरबा खेळन्यासाठी “अ ” क्रॉझ अँकडमी , देवरी व माजी सभापती/ जि.प.सदस्या सविता पुराम यानीं आयोजीत केलेल्या गरबात भाग घेतलेल्या महिलानीं पावसाचा अडथळा न जुमानता गरबा खेळण्याचा आनंद घेतला. पावसाच्या सरी अंगावर घेत उत्साहात थिरकत नवरात्रीचा रंग कायम ठेवला. बघ्यांनीही छत्रीचा आधार घेऊन कार्यक्रमाचा आनंद घेतला. काही ठिकाणी पावसामुळे जागा ओली झालेली असतानाही महिलांनी पारंपरिक पोशाखात दांडिया खेळून उत्सवाची शोभा वाढवली. “देवीची आराधना आणि नवरात्रीचा आनंद पावसामुळे थांबू शकत नाही,” अशी भावना यावेळी आयोजकानीं व्यक्त केली.









