पथसंचलन दुपारी तीन वाजता…
गोंदिया ( देवरी ) ; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव व शस्त्रपूजन कार्यक्रम आश्विन शुक्ल 10, उद्या रविवार दिनांक पाच ऑक्टोबर 2025 सायंकाळी 5 वाजता देवरी शहराच्या पंचशील चौकातील समाजमंदीराच्या पटांगणात संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री लक्ष्मणजी नाईक सामाजिक कार्यकर्ता डवकी तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता म्हणून मा.श्री राजेन्द्रंजी दोनाडकर , विभाग कार्यवाह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हे राहणार आहेत.
आज दिनांक पाच ऑक्टोबरला सर्व स्वयंसेवकांचा पुर्ण गणवेशात दुपारी तीन वाजता देवरी शहरातून पथसंचलन निघणार आहे. सदर पथसंचलन समाजमंदीर पंचशील चौक, गणेश चौक, के. एस. जैन विद्यालय , नगरपंचायत रोड, बाजार लाईन, दुर्गा चौक, कारगील चौक, चिचगड रोड , सुरभी चौक परत समाज मंदिर पंचशील चौक असा पथसंचलन मार्ग राहणार आहे.
उपरोक्त कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका संघचालक विष्णुप्रसाद अग्रवाल व तालुका कार्यवाह सुरेश चन्ने यांनी केले आहे.









