राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष : जोरदार पावसातही स्वयंसेवकांचं शिस्तबद्ध पथसंचलन, देवरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

देवरी संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त पंथ संचलन आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी जोरदार पावसानं हजेरी लावली. जोराच्या पावसातदेखील स्वयंसेवकांनी पथसंचलन सुरूच ठेवलं.

गोंदिया ( देवरी ) ; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त शहरात पंथ संचलन आयोजित करण्यात आलं होतं. पण हे संचलन सुरू होताच जोरदार पावसानं हजेरी लावली. जोरदार पावसातदेखील स्वयंसेवकांनी पथसंचलन सुरूच ठेवलं. खरं तर वरविवारी ( 05 ऑक्टोबंर ) सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास पंचसील चौक समाज मंदिर  परिसरातून या पथ संचलनाला सुरुवात झाली. मात्र, संचलन सुरू होऊन अवघ्या 5 ते 10 मिनिटांतच देवरीमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. विजेच्या गडगडाट व वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे काही काळासाठी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. पण तरीही संघाच्या स्वयंसेवकांनी शिस्तबद्धतेनं आणि निष्ठेनं पथ संचलन सुरूच ठेवलं.

पथसंचलनानं वेधलं देवरीकरांचं लक्ष : 05 अक्टूबर 1925 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती. संघाची शिस्त हीच त्याची मुख्य ओळख आहे. याचा प्रत्यय संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित पथसंचलनादरम्यान दिसून आला. देवरी शहरातील अनेक चौकात साचलेल्या पाण्यातून स्वयंसेवकांनी वाट काढत पथसंचलन सुरू ठेवलं. अशा स्थितीत पावसातही पथसंचलन सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलं. यावेळी भर पावसातून निघालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाचं नागरिकांनीही भर पावसातच स्वागत केलं.

शिस्त आणि परंपरा कायम….

विजयादशमीच्या निमित्तानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पथसंचलन आजोयित करण्यात येतं. मात्र यंदा संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त 05 अक्टूबर रोजी देवरी शहरात विशेष पथसंचलन आयोजित करण्यात आलंय. या कार्यक्रमात शेकडो स्वयंसेवकांनी संघाच्या पूर्ण गणवेशात, हातात दंड घेऊन उत्साहानं सहभाग घेतला.

पथसंचलनाचं नागरिकांकडून जोरदार पावसात स्वागत…

देवरी शहरातील समाज मंदिर पंचसील चौक  परिसरातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाला प्रारंभ झाला. हे पथसंचलन गणेश चौक, के. एस. जैन विद्यालय , नगरपंचायत रोड, बाजार चौक, दुर्गा चौक, कारगील चौक, चिचगड रोड, सुरभी चौक या मार्गे मार्गक्रमण करत पुन्हा समाज मंदिर पंचसील चौक समाजमंदिर येथे समारोपासाठी आलं. या संपूर्ण मार्गावर नागरिकांनी भर पावसातही उत्स्फूर्त सहभाग घेत संघाच्या पथसंचलनावर पुष्पवृष्टी करून स्वागत केलं.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

छत्तीसगढ़ के आसमान पर बिखरेगी तिरंगे की झटा नया रायपुर में सूर्य किरण का रोमांचक एयर शो 5 नवंबर को फाइटर प्लेन मनूवर करते हुए बनाएंगे हार्ट, डायमंड, लूप, ग्रोवर, डान जैसी कई फार्मेशन नौ फाईटर प्लेन आधे घंटे तक आसमान में दिखाएंगे करतब