गोंदिया ( देवरी ) : येथील सुप्रसिध्द मॉ धुकेश्वरी सार्वजनिक मंदिरात मंदिर ट्रस्टच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण २२ ऑक्टोबर बुधवारला आमदार संजय पुराम यांच्या अध्यक्षतेखाली दीपावली मिलनचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सर्वधर्म समभावाची देवरीची संस्कृती कायम ठेवून शहरातील विविध धर्मातील, पंथातील आणि राजकीय मंडळींनी उपस्थित राहुन एकतेचे प्रदर्शन केले.
यावेळी नगराध्यक्ष संजू उईके, पोलिस निरीक्षक प्रवीण डांगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती
प्रमोद संगीडवार, संचालक श्रीकृष्ण हुकरे, माजी सभापती राधेश्याम बगडीया, मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी मुन्नाभाई अन्सारी, बौद्ध समाजाचे तारेश मेश्राम, शिक्ख समाजाचे इंदरजीतसिंग भाटीया, अग्रसेन समितीचे अध्यक्ष रामअवतार अग्रवाल, जैन समाजाचे सुशील जैन, विश्व हिंदू परिषदेचे तालुकाध्यक्ष राजकुमार शाहू , प्रकल्प अधिकारी उमेश काशीद, भाजपचे समन्वयक वीरेंद्र अंजनकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष छोटेलाल बिसेन, नगर पंचायतचे माजी उपाध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, नगरसेविका पिंकी कटकवार, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. प्रशांत संगीडवार, उपाध्यक्ष कुवरलाल भेलावे, सचिव सुशील शेंद्रे, प्रा. मधू शेंद्रे, जुबीन खान, सुनील चोपकर, आणि इतर सामाजिक मंडळी उपस्थित होती.
सर्वांनी आपापल्या मार्गदर्शनात आयोजक मंदिर समितीची प्रशंसा करुन भविष्यात सुद्धा देवरीत सर्वधर्म समभावाची संस्कृती टिकून राहील, याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. प्रशांत संगीडवार यांनी मांडले. संचालन प्रा. प्रभू मनगटे यांनी केले असून सर्वांचे आभार विलास शिंदे यांनी मानले.









