बचत गटाला आता आर्थिक मदत करण्यास बँकांचाही पुढ़ाकार…
देवरी : चिचगड पोलिस्टेसन हद्दीत प्रत्येक गावात गल्लोगल्ली बचत गटांचीसंख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मात्र, विविध व्यवसाय चालविण्यासाठी आणि त्यांना स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभेराहण्यासाठी या गटांना योग्यवेळी मार्गदर्शनाची व दिशा देण्याची खर्या अर्थाने आजच्या घडीला गरज असल्याचे मार्गदर्शन ग्राम तुमडिकसा येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्याने महिला बचत गटाच्या मेळाव्यात चिचगड पोलिस्टेसनचे ठानेदार तुषार काळेल यांनी केले.
बचत ही महिलांच्या रक्तातच भिनलेली आहे. मात्र, ती आतापर्यंत महिलांना ओळखता आली नाही. बाजारात गेलेली स्त्री आठवडयाचा संपूर्ण बाजार करून थोडे पैसे नकळत कुटुंबाच्या शिलकीत टाकत असते. हेच पैसे भविष्यात संसारात काही अडचणी आल्यास त्या सोडविण्यास स्वतःहून खर्च करते. बचतगटाचा प्रसार आज बघता बघता देशभर वाढताना दिसून येत आहे.यासाठी सर्व वर्गातील महिलांनी पुढ़ाकार घेणे आवश्यक असल्याचेही काळेल यांनी मार्गदर्शनात सांगीतले.
बचत गट संकल्पना ही चांगली योजना आहे. या माध्यमातून महिलाएकत्र येतात स्वतःचे सुख-दुःख समजावून घेऊन प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून येतात. महिला वर्गाला या निमित्ताने स्वतःचे व्यासपीठ मिळते आणि महिलावर्गातील सुप्त गुणांना वाव मिळून जातो. बचत गटाला आता आर्थिक मदत करण्यास बँकांनी पुढ़ाकार घेतला आहे. कोणताही व्यवसाय करण्यास सवलत असते. अल्प व्याजदराने कर्ज मंजूर करून घेताना त्यांना कोणत्याही प्रकारचे कागदी घोडे नाचवावे लागत नाहीत. एकमेकींच्या विश्वासावर हा संघ चालतो. मात्र, कुटुंब प्रमुखांची एक स्वाक्षरी त्यासाठी घ्यावी लागते. बचत गटाच्या माध्यमातून पैसे घेऊन खरंतर महिलावर्गाने स्वतःचा व्यवसाय उभारून उत्कर्ष करून दाखवावयास हवा.
मार्गदर्शनाची नितांत गरज
महिलावर्गाला स्वतःचा घर संसार आणे शेतीची कामे सांभाळूनफावल्या वेळेत व्यवसाय करण्यास सवलत आहे. मात्र, कोणताव्यवसाय करावा म्हणजे तो चांगल्याप्रकारे चालेल याचे मार्गदर्शनकरण्याचा दुवा त्यांच्याजवळ नाही. त्यामुळे महिला गडबडूनजातात. बँकेमधून कर्जाऊ रक्कम देणारयांनी महिलावर्गालामार्गदर्शन करणे गरजेचे आहे. बचत गटांच्या माध्यमातूनशिवणक्लासचे प्रशिक्षण, पाणी अडवा पाणी जिरवा मोहीम, ग्रामस्वच्छता अभियान, तळागाळातील शिकणारया मुलींना प्रोत्साहनधन, महिला दिन, महिला आरोग्य तपासणी शिबिर या मोहिमाराबविल्या जाताहेत. समाजातील महिलांना संघटित करण्याचाप्रयत्न बचत गटांच्या माध्यमातून सुरू आहे. याला महिलावगचीसकारात्मक जोड मिळायला हवी.
दुग्ध व्यवसाय, मसाला, सांडगे, पापड, शेवया, अगरबत्ती, टेलरिंग, बेकरी अशा अनेक व्यवसायांतून महिला आपल्या स्बतःच्या पायावर उभ्या राहू शकतात. सदर खात्यांनी अशा उद्योगांतून महिला रोज नवनवीन पदार्थ बनवायला लागल्या आणि असे पदार्थ दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकाला गरजेचे आहेत. मात्र, ग्रामीण महिलांना गरज आहे ती योग्य मार्गदर्शन, आर्थिक मदत आणि यंत्रसामग्रीची. अशासर्व गोष्टींची जुळवणूक करून दिली तर ग्रामीण भागातील महिला निश्चितच सर्व क्षेत्रात पुढे येण्यास मदत होईल. यासाठी शासनाने व इतर उद्योगधंदे, व्यवसाय करणार्या उद्योगपतींनी महिलांना आणि आर्थिक पाठबळ मिळवून द्यावे.
तुषार काळेल ठाणेदार चिचगड









