पर्यावरणाचे संवर्धनासाठी देवरी नगरपंचायत तर्फे “माझी वसुंधरा अभियाना” अंतर्गत शहरात जनाजागृती रॅली…

नगरपंचायत देवरीचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी जनजागृती रॅलीत झाले सहभागी…

देवरी  : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल या विभागाने ‘माझी वसुंधरा’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. माझी वसुंधरा अभियान हा राज्यातील स्थानिक संस्थांमधील पर्यावरणाच्या संवर्धनासाठी निसर्गाच्या पंचतत्त्वांवर (पंचमहाभूतांवर) आधारित राबवण्यात येणारा पहिला कृतिशील उपक्रम आहे. हे अभियान २ ऑक्टोबर २०२० रोजी पर्यटन, पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग याद्वारे सुरू करण्यात आले. काल दिनांक 6 जीनेवारी रोजी देवरी नगरपंचायत तर्फे देवरी शहरात रॅली काढत “माझी वसुंधरा अभियान” जनजागृती करीत राबविन्यात आले आहे.

या अभियानांतर्गत देवरी नगरपचायत , नागरी स्थानिक संस्था आणि ग्रामपंचायती या स्थानिक संस्थांच्या पर्यावरणाचे जतन, संरक्षण आणि संवर्धनासाठी योजना प्रभावीपणे व जनजागृती करीता देवरी नगरपंचायत तर्फे देवरी नगरपंचात तर्फे जनजागृती करन्यात आली आहे. पर्यावरणाच्या आणि हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने ‘माझी वसुंधरा’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. ज्याची जनजागृती देवरी नगरपंचायत तर्फे करन्यात येत आहे.


“माझी वसुंधरा” नेमक काय आहे..?

निसर्गाच्या पंचतत्त्वांवर आधारित पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या विविध शासकीय योजना, कार्यक्रम, उपाययोजना एकत्रित करून त्या प्रभावीपणे आणि मिशन मोड पद्धतीने राबविण्यासाठी इंडिकेटर स्वरूपात असलेली टूलकिट तयार करून स्थानिक स्वराज्य संस्थांना दिली जाते. यामध्ये त्यांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी त्यांना गुण देण्यात येतात. या टूलकिटनुसार विविध उपाययोजना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एप्रिल ते मार्च या एका वर्षाच्या कालावधीत राबविल्या जातात.

वस्तुतः पर्यावरणाच्या आणि हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्याचप्रमाणे पर्यावरणपूरक जीवनशैली ही लोक चळवळ व्हावी हा या सर्व अभियानाचा पाया आहे. यामध्ये कार्बन सिक्वेस्ट्रेशन, हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी होणे आणि शाश्‍वत निसर्गपूरक जीवनशैलीचा अंगीकार लोकांकडून व्हावा. या तीन स्तंभावर माजी वसुंधरा अभियान उभे राहिले आहे.

अत्यंत कुशलतेने या अभियानाची रचना करण्यात आलेली आहे. हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी व्यापक जनजागृती आवश्यक ठरते. या जनजागृतीसाठी अनेक विभागांकडून स्वतंत्रपणे योजना राबविण्यात येतात. अशा सर्व योजना एकत्र करून ते माजी वसुंधरा अभियानाच्या स्पर्धेमध्ये भाग घेणे आणि पर्यायाने त्या योजनांची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात होणे हा अग्रक्रम आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें