संजय पुराम यांनी हजारो समर्थकांसह आज उमेदवारी अर्ज केला दाखल…

गोंदिया (देवरी) : आमगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय पुराम यांनी भारतीय जनता पक्षाकडून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आज सोमवारी  28 रोजी देवरीतून हजारो समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुती पक्षाकडून माजी गृह मंत्री मध्यप्रदेश नरोत्तम मिश्रा , राष्ट्रवादी नेता नरेश माहेश्वरी , रमेश ताराम , भाजपा नेता विजय शिवनकर, शिवसेना जिल्रा अध्यक्ष सुरेन्द्रं नायडू , हरसेजी , माजी आमदार  केशव मानकर, भेरसींग नागपुरे, झामंसीग येरणे , प्रविण दहीकर, प्रमोद संगीडवार  यांच्यासह महायुतीचे अनेक बडे नेते उपस्थित होते.

माजी आमदार संजय पुराम यांच्या उमेदवारीसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते देवरी येथिल भाजप कार्यालयात जमले होते. संजय पुराम यांनी घरून निघण्यापूर्वी आपली आराध्य  कचारगड येथे जाऊन पूजा, अर्चना केली आणि नंतर देवरी येथील भाजप कार्यालयात पोहोचून कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यांनी रॅली दरम्यान राणी दुर्गावती चौकात राणी दुर्गावती यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पित केले. नामांकन मिरवणुकीत माजी आमदार संजय पुराम यांच्यासह त्यांच्या पत्नी सविताताई पुराम  व कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी त्यांच्या पत्नीने “कहो दिल से- संजय पुराम फिर से’चा आवाज बुलंद केला.

संजय पुराम यांनी आमगाव विधानसेच्या आमगाव देवरी व सालेकसा  परिसराचे चित्र बदलण्याचे ऐतिहासिक काम 2014 ते 2019 आमदारकीच्या कारकिर्दीत केले असल्याचे भाजप नेत्यांनी आवर्जून सांगितले . ते म्हणाले, जे अतुलनीय काम इतर पक्षाच्या नेत्यानीं  पाच वर्षात  केले नाही ते कार्य 2014 ते 2019 या वर्षातील सजय पुराम यांच्या कारकिर्दीत झाले आहे. आमगाव विधानसभेतील जनता पूर्णपणे जनतेचे आमदार असलेले संजय पुराम यांच्या  पाठीशी आहे.

विजय निश्चित, कमळ फुलवून विक्रम करू…

संजय पुराम यांच्या नामांकनावेळी सर्व समाजातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने त्यांचा विजय पुन्हा निश्चित झाल्याचे दिसून आले. सर्व समाजातील लोकांनी संजय पुराम  यांचे कौतुक केले आणि सांगितले की ते जात-धर्माची पर्वा करत नाहीत आणि विकासावर बोलतात. आमगाव विधानसभा मतदारसंघात खुर्ची मिळवणे हे त्यांचे ध्येय नसून संपूर्ण समाजाची प्रगती, उन्नती व विकास हेच त्यांचे ध्येय आहे. आमगाव – देवरी विधानसभेतुन संजुबाबूंचा विजय निश्चित असून ते कमळ फुलवून आमगाव विधानसभेत ऐतिहासिक विक्रम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जनसमुदायाला संबोधित केले, कमळ फुलणार, इतिहास रचणार..

देवरी येथील भाजप कार्यालयाच्या विशाल मंडपात जमलेले हजारो समर्थक व महायुतीचे कार्यकर्त्याना, मंचावरुन माजी आमदार संजय पुराम गृह मंत्री मध्यप्रदेश नरोत्तम मिश्रा , राष्ट्रवादी नेता नरेश माहेश्वरी , रमेश ताराम , भाजपा नेता विजय शिवनकर, शिवसेना जिल्रा अध्यक्ष सुरेन्द्रं नायडू , हरसेजी , माजी आमदार  केशव मानकर, भेरसींग नागपुरे, आदी अनेक नेत्यांनी उपस्थित हजारोंच्या जनसमुदायाला संबोधित करून यावेळी कमल आमगाव विधानसभेत  इतिहास घडवेल असा विश्वास व्यक्त केला.

जनतेच्या आमदारांचे भव्य स्वागत…

नामांकन मिरवणुकीत जनतेचे आमदार संजय पुराम यांचे सर्व समाज बांधवांनी जल्लोषात स्वागत केले. पुष्पवृष्टी करून विजयाचे आशीर्वाद दिले. या मिरवणुकीत प्रत्येक समाजाबरोबरच मुस्लिम व बौद्ध समाजातील लोकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली व आमदाराचे स्वागत, अभिवादन व सत्कार केला.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें