गोंदिया : महाराष्ट्र शासन राजपत्र, सामान्य प्रशासन विभाग, 9 नोव्हेंबर 2023 चे अधिसूचनेनुसार 15 नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंती निमीत्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. सदर सार्वजनिक सुट्टी लक्षात घेता आरोग्य संस्थेअंतर्गत कुंवर तिलकसिंह जिल्हा सामान्य रुग्णालय व बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय, गोंदिया येथील बाह्यरुग्ण विभाग 15 नोव्हेंबरला गुरुनानक जयंती निमीत्त बंद राहणार आहे. असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिगांबर मरसकोल्हे यांनी कळविले आहे.









