मुख्य रसत्यालगत असलेल्या झाडांना रात्रीच्या उजेडात चमकणारे “रिफ्लेक्टर”…
देवरी : चिचगड पोलीस स्टेशनच्या वतीने वाहतूक सप्ताह अभियान निमित्त वाहनचालकांना गुलाब पुष्प देऊन वाहुतुकीचे नियम पाळण्याबाबत मार्गदर्शन करत चिचगड पोलिस्टेसन हद्दीतील मुख्य रसत्यालगद असलेल्या झांडावर रात्रीच्या उजेडात चमकनारे रिप्लेकटर लावन्यात आले आहे. चिचगड पोलीस स्टेशनच्या वतीने वाहतूक सप्ताह आयोजित केला असून त्या अनुषंगाने चिचगड पोलीस स्टेशनचे ठाणेदार तुषार काळेल यांच्या मार्गदर्शनाखाली चिचगड पोलिस्टेसन हद्दीतील मुख्य रसत्यावरून चारचाकी वाहन चालक, मोटारसायकलस्वार यांना थांबवून पुष्पगुच्छ देऊन वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत सूचना देन्यात येत आहेत. तसेच वाहतूक सप्ताह व रस्ता सुरक्षा संबधी योग्य ते मार्गदर्शन करण्यात येत आहेत.
विशेषता गोंदिया जिल्हा पोलीस दादालोरा खिडकी योजनेअंतर्गत गोरख भामरे पोलीस अधीक्षक गोंदिया, नित्यानंद झा अप्पर पोलीस अधीक्षक गोंदिया कॅम्प देवरी, विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी, पो. नि. वाहतूक शाखा गोंदिया नागेश खं. भास्कर यांच्या मार्गदर्शनाखाली चिचगड पोलिस्टेसनचेे ठाणेदार तुषार काळेल व त्याची टीमच्या मदतीने पोलीस स्टेशन चिचगड येथे दि . 31 जानेवारी 2024 ते 02 जानेवारी 2025 या कालावधीत वाहतूक सप्ताहाच्या अनुषंगाने रस्त्यांवर तसेच वळणांवर होणारे अपघात टाळण्याकरिता पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व मुख्य रस्त्यावरील वळणांवर तसेच रस्त्या लगतच असणारे झाडांना तसेच खांब हे वाहन चालकांना रात्री दरम्यान लांबूनच दिसून यावेत या करिता रात्रीच्या उजेडात चमकणारे “रिफ्लेक्टर” बसवण्यात आले आहेत.









