फरार आरोपीची माहिती मिळताच देवरी पोलीस स्टेसनला कळवा.

देवरी  :  दिनाक 05 ऑक्टोबंर 2024  रोजी देवरी तालुक्यातील मौजा शिरपुर येथील  राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ रायपुर ते नागपुर मार्गावर पोलिस कर्मचारी नाकाबंदीकरीत असतांना वाहन क्र. RJ -08- TA-836 ला थांबवून वाहनाची तपासणी केली. ज्यात वाहनाच्या मागील डिक्कीमध्ये काळया, पांढ-या व खांकी रंगाच्या पुडक्यामध्ये गांजा आढळुन आला. हे आरोपी अवैध रित्या गांजाची वाहतुक करतांना पोलीसांना समजुन आले. ज्यात एकुण 126.14 किलो ग्रँम ओलसर गांजा सदृष्य अंमली पदार्थ मिळुन आले. ज्याची अंदाजे एकुण किंमत १८,९२,१०০/- रु (अक्षरी अठरा लक्ष ब्यानऊ हजार शंभर रुपये.) माल आरोपोकडुन जप्त करण्यात आले.

आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन देवरी येथे अप. क्र.व कलम 322 /2024 कलम- 8(क), 20(2)( ब)( क),22(क)(2), 29 एन.डी.पी.एस अँक्ट- 1985 अंतर्गत गुन्हा नोंद करन्यात आले होते. सदर गुन्हयात चार आरोपी अटक करन्यात आले. तर इतर दोन आरोपी नामे 1) प्रेमानंद कुमुद मेहेर, वय 31 वर्षें, रा. गोईकानिपाडा, बालदीयमाल, नकटीगुडा राज्य ओडीसा 2)रतनलाल गोपीलाल गुर्जर वय अंदाजे- 38 वर्षे रा. खवासपुरा, तह- दु्नी,/देवली, जि. टोंक, राज्य- राजस्थान, हे अद्यापही घटनेच्या तारखेपासुन फरार आहेत. सदर दोन्ही नावाचे आरोपी आढळल्यास  पोलीस स्टेशन देवरी येथील दुरध्वणी क्रमांक 07199 – 225149 वर कळवन्याचे आवाहन देवरी पोलिसां तर्फे  करण्यात आले आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

error: Copy Is Not Allowed !!