रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत हेल्मेट मोटारसायकल रेलीचे आयोजन करण्यात आले. वर्दीतील पोलिस व परिवहन अधिकारी-कर्मचान्यांनी नागरीकांना हैल्मेट वापरण्याचा संदेश दिला
गोंदिया : राज्य रस्ता सुरक्षा अभियान २०२५ अंतर्गत परवाह -काळजी’ ही थीम घेऊन जनजागृतीसाठी हेल्मेट मोटारसायकलरलीचे आयोजन करण्यात आले. रैलीत सहभागी वर्दीतील पोलिस,परिवहन अधिकारी-कर्मचा्यांनी नागरीकांना हेल्मेट चा वापरकरण्याचा संदेश दिला. आज बुधवारी परिवहण कार्यालय गोंदिया येथून रेैलीचीसुरुवात करत गोंदिया शहरातील प्रमुख चौकात परिभ्रमन करत परिवहण कार्यालय गोंदिया येथे समारोप झाला.
हेल्मेट मोटारसायकल रॅलीला अतिरिक्त जिल्राधिकारी भैयालाल बेहरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवण्यात आली. रॅलीत 150 दुचाकीस्वारांनी सहभाग घेतला. यावेळी उप प्रादेशिक परिवह अधिकारी राजेंन्द्र केसरकर यांनी रैलीचे वैशिषट्ट्य सांगताना त्यात खाकी गणवेशातील अधिकारी-कर्मचान्यांचा सहभाग आहे असे सांगितले.
गणवेशातील अधिकारी हेल्मेटसह दुचाकी चालवत असल्याने नागरिकांना प्रभावीपणे संदेश देण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेन्द्रं केसरकर होते. रॅलीच्या समारोपप्रसंगी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना हैल्मेटवापरण्याचे महत्त्व पटवून दिले. अपघातांत सर्वाधिक मृत्यू है हैल्मेट न वापरणार्या दुचाकीस्वारांचे होतात. हैल्मेटमुळे चालकाचे प्राण वाचवले जाऊ शकतात, असे केसरकर म्हणाले. त्यांनी जिल्ह्मातील सर्व नागरिकांना दुचाकीचालवताना हैल्मेट वापरण्याचे आवाहन केले.
या रॅलीत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथील अधिकारी ओमप्रकाश सयाम, सर्व स. मो. वा. निरिक्षक व सर्व कर्मचारी. तसेच वाहतूक शाखा गोंदिया चे सहायक पोलिस निरीक्षक राहुल पाटील व वाहतूक शाखेचे कर्मचारी उपस्थीत होते. व अन्य कर्मचायांनी रेली यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.









