विरुद्ध दिसेने येनार्या भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

ट्रकचलक पसार….

गोंदिया ( देवरी, भरेगांव ) ; देवरी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ नैनपुर फाट्याजवळील उडानपुलावर आज मंगळवार सयंकाळी ७.०० वाजता दरम्यान काळाने घाला घातला. मंगळवर बाजार करुन बाघनदी आवल्या गावाकडे जात असलेल्या दुचाकीला विरुद्ध दिशेने  नेणाऱ्या एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने त्या तरुनाचा जागीच अंत झाला.

भीषण धडक, दुचाकीचा चुराडा…

मिळालेल्या माहितीनुसार, शिरपुर कडुन उडानपुलावरुन खाली येनार्या ट्रकने (CG08 AS 7598) समोरून येणाऱ्या दुचाकीला (CG08 BC 4797) जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा पूर्णतः चुराडा झाला. यामध्ये सुरज गोहरी यादव (वय २६) राहनार बाघनदी याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे बाघनदी परिसरात मोठी खळबळ उडाली असून मृतांच्या कुटुंबार शोककळा पसरली आहे.

पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच देवरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तर ट्रक चालक पसार झाला असुन त्याचाही शोध देवरी पोलिस घेत आहेत.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें