गोंदिया जिल्ह्यातील हॉटेल आणि धाब्यांवर पोलिसांची मोठी कारवाई; १० दिवसांत २० गुन्हे दाखल, २२ आरोपींवर कडक कारवाई

गोंदिया : जिल्ह्यातील हॉटेल, धाबे आणि टपऱ्यांवर चालणाऱ्या अवैध दारू विक्रीला पूर्णपणे चाप लावण्यासाठी गोंदिया पोलीस दलाने धडक मोहीम हाती घेतली आहे. १ ऑगस्ट ते १० ऑगस्ट २०२६ या अवघ्या १० दिवसांच्या कालावधीत पोलिसांनी विशेष कारवाई करत एकूण २० गुन्हे दाखल केले असून २२ आरोपींवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
जिल्ह्यात ठिकठिकाणी असलेल्या हॉटेल आणि धाब्यांवर बेकायदेशीरपणे दारूची विक्री होत असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त होत होत्या. या अवैध धंद्यांचा समूळ उच्चाटन करण्यासाठी गोंदियाचे पोलीस अधीक्षक मा. श्री. गोरख भामरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या ठाणेदारांना विशेष मोहिमेचे निर्देश दिले होते.
याच आदेशाच्या अनुषंगाने पोलीस पथकांनी १ ते १० ऑगस्टदरम्यान जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत छापेमारी केली. या धडक कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
दरम्यान, गोंदिया जिल्ह्यात अशा प्रकारची अवैध दारू विक्री अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. आगामी काळातही ही मोहीम अधिक तीव्र करून जिल्ह्यातील बेकायदेशीर धंदे समूळ नष्ट केले जातील, असे आदेश पोलीस अधीक्षक श्री. भामरे यांनी दिले आहेत.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

error: Copy Is Not Allowed !!