नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आज २४ नामनिर्देशनपत्र दाखल

6 ऑक्टोबर नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस

नागपूर : नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी आज १८ उमेदवारांनी २४ नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत. आतापर्यंत दाखल नामनिर्देशनपत्रांची संख्या 30 झाली आहे. ६ ऑक्टोबर हा नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

आज शिवाजी सोनसरे ( अपक्ष), अभिजित वंजारी (इंडियन नॅशनल काँग्रेस), ॲड. प्रदीप सोमकुवर (अपक्ष), सुधाकर कोहळे (भारतीय जनता पार्टी), सिद्धार्थ निकोसे ( बळीराजा पार्टी), उत्तमप्रकाश शहारे ( अपक्ष), अनिल सोले ( अपक्ष), नितेश कराळे ( अपक्ष), अशोक लांजेवार ( अपक्ष), विनायक अवचट (अपक्ष), गजानन लोखंडे (अपक्ष), राजेंद्र आत्राम ( अपक्ष), मंजिल गेडाम( अपक्ष), रमण सेनाड (अपक्ष), प्रमोद गुरपुडे (अपक्ष), नरेंद्र पाटील (अपक्ष), रामराव चव्हाण ( जय विदर्भ पार्टी), जगदीश वाडीभस्मे ( अपक्ष) यांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले.

यात दोन नामनिर्देशनपत्रे शिवाजी सोनसरे (अपक्ष), अभिजित वंजारी (इंडियन नॅशनल काँग्रेस), सुधाकर कोहळे (भारतीय जनता पार्टी), सिद्धार्थ निकोसे ( अपक्ष), अनिल सोले ( अपक्ष), मंजिल गेडाम( अपक्ष) यांनी दाखल केली आहेत.

अर्जांची छाननी 7 ऑक्टोबर, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 9 ऑक्टोबर  आहे. मतदान 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत होईल. मतमोजणी 27 ऑक्टोबर 2026 रोजी करण्यात येणार असून, निवडणूक प्रक्रिया 31 ऑक्टोबर 2026 पूर्वी पूर्ण केली जाणार आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

error: Copy Is Not Allowed !!