गोंदिया ( देवरी ) : देवरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या माँ धूक्केश्वरी सार्वजनिक मंदिराच्या कुलूप व दरवाजा तोडून अज्ञात चोराने मंदिरातील दानपेटी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरािरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस कसून तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ९:०० वाजता ते १४ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे ५:३० वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. अज्ञात चोराने माँ धुपेश्वरी मंदिराच्या दरवाजाचे कुलूप कशाच्या तरी साहाय्याने तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर मंदिरात असलेली दानपेटी बाहेर काढून त्याची तोडफोड केली आणि त्यातील अंदाजे १०,००० रुपये रोख रक्कम चोरून नेली.
या प्रकरणी फिर्यादी सुशील पतीराम शेंदरे (वय ६२ वर्ष, रा. वार्ड क्र. ०१, देवरी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवरी पोलीस ठाण्यात अप्लास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार बडोले हे करीत आहेत. मंदिरात चोरी झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.









