शेतकऱ्यांनी 31 मार्चपर्यंत शासकीय धान खरेदी केंद्रांवर धान विक्री करावी

खरीप पणन हंगाम 2026-27 साठी जिल्ह्यात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रे सुरू

           गोंदिया : शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2026-27 मध्ये शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यंदाच्या हंगामात 31 मार्च 2027 पर्यंत शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्याबाबत शासनाकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार गोंदिया जिल्ह्यातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
           जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी ऑनलाइन नाव नोंदणी केली आहे, त्यांनी आपल्या तालुक्यातील नजीकच्या शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर जाऊन शासनाने निर्धारित केलेल्या मुदतीत धानाची विक्री करावी. शेतकऱ्यांनी शासनाच्या खरेदी योजनेचा लाभ घ्यावा आणि निर्धारित कालावधीत आपला धान खरेदी केंद्रावर विक्रीसाठी उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी मनोज बाजपेयी यांनी केले आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

error: Copy Is Not Allowed !!