कोषागार प्रणाली 26 ते 29 ऑक्टोबर पर्यंत बंद

गोंदिया : संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याशी झालेल्या 22 ऑक्टोबर 2024 रोजी ऑनलाईन बैठकीत सूचित केल्यानुसार Cloud Migration Downtime असल्याने जिल्ह्यातील सर्व कोषागार/उपकोषागार कार्यालयातील कोषागार प्रणाली 26 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत बंद राहणार. दिनांक 25 ऑक्टोबर 2024 च्या मध्यरात्रीपासून MAHAKOSH वरील Cloud Migration Downtime चालु होत असल्याने सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांचेकडून माहे ऑक्टोबर चे वेतन/उत्सव देयके 25 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत कोषागारात/उपकोषागारात सादर होतील याची आहरण व संवितरण अधिकारी यांनी काळजी घ्यावी. तसेच कोषागाराकडून पारीत झालेल्या देयकास    ई-कुबेर प्रणालीसाठी तात्काळ आपल्या स्तरावरुन मंजुरी प्रदान करण्याबाबतची कार्यवाही करावी. असे कोषागार अधिकारी, गोंदिया यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें