कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी नोंदणी अनिवार्य

गोंदिया : राज्यात कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच अधिक पारदर्शकता वाढावी यासाठी फार्मर आयडी नोंदणी अनिवार्य करण्यात आलेले असून लवकरात लवकर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फार्मर आयडी नोंदणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक. मंगेश गोंदावले यांनी केले आहे
            14 नोव्हेंबर 2024 पासून ॲग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आलेली आहे. तसेच दि.15 एप्रिल 2025 पासून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आलेली आहे.
            ज्या शेतकरी बांधव-भगिनींनी अद्याप आपली फार्मर आयडी काढलेली नाही, त्यांनी तात्काळ नोंदणी करुन घ्यावी. नोंदणी करण्यासाठी शेतकरी आपल्या नजिकच्या सेवा सुविधा केंद्रावर भेट देऊ शकतात किंवा स्वत:ही ॲग्रीस्टॅक पोर्टलवरुन ऑनलाईन नोंदणी करु शकतात.
            यापुढे कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच विविध कृषी निविष्ठा उदा. बियाणे, खते, औषधे इत्यादी प्राप्त करण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक राहणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधव-भगिनींना याद्वारे आवाहन करण्यात येत की, ज्यांनी अद्याप पर्यंत फार्मर आयडी नोंदणी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर आपली फार्मर आयडी काढून घ्यावी.
            फार्मर आयडी नोंदणी संदर्भात कोणतीही अडचण आाल्यास नागपूर विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी अजितकुमार गेजगे यांच्याशी मो. 9657109809 यावर संपर्क साधावा. असे जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी कळविले आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें