देवरी येथील वॉर्ड नं.१६ गोंडवाना नगर येथे पहिल्यांदाच तान्हा पोळा उत्साहात साजरा; बालगोपाळांचा जल्लोष

गोंदिया ( देवरी ) : येथील स्थानिक वॉर्ड नं.१६ गोंडवाना नगर परिसरात ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपत यावर्षी पहिल्यांदाच आज दिनांक ११ सप्टेंबर २०२६ रोज शुक्रवारला ‘तान्हा पोळा’ अत्यंत उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यामुळे परिसरातील बालगोपाळांमध्ये प्रचंड उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. विदर्भाच्या संस्कृतीत महत्त्वाचे स्थान असलेल्या मोठ्या पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी लहान मुलांसाठी तान्हा पोळा साजरा केला जातो. गोंडवाना नगर भागात यापूर्वी अशा प्रकारे सार्वजनिक पातळीवर आयोजन झाले नव्हते. त्यामुळे स्थानिक रहिवासी डॉ. उपदेश लाडे सर यांच्या विशेष पुढाकारातून यावर्षी प्रथमच हा उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आला. यानिमित्ताने संपूर्ण परिसर सजवण्यात आला होता. या सोहळ्यात परिसरातील बालकांनी आपल्या लाकडी नंदीबैलांना आकर्षक रंगरंगोटी, घुंगरू, झूल आणि बाशिंग लावून मोठ्या अभिमानाने आणले होते. पारंपरिक वेशभूषेत आलेल्या चिमुरड्यांनी उत्साहात घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या बालकांच्या उत्साहाने उपस्थितांचे डोळे दिपवून टाकले. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी झालेल्या सर्व बालकांना आयोजकांच्या वतीने खाऊ आणि आकर्षक भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच सर्वोत्तम सजवलेल्या लाकडी बैलांना आणि उत्कृष्ट वेशभूषेला प्रथम पुरस्कार ₹१५०० स्व. श्री. भीमराव लाडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डॉ. उपदेश लाडे यांचे कडून दुष्यंत रमेश तोंडफोडे याने पटकावले. द्वितीय पुरस्कार ₹१००० श्री. दिलिप दखने यांचे कडून आद्वीक हरीश राऊत याने पटकावले. तर तृतीय पुरस्कार ₹५०० श्री. हरीश राऊत यांचे कडून कु. आध्या सुनिलकुमार येरणे हिला देण्यात आले तसेच प्रोत्साहनपर पुरस्कार म्हणून निवांश अनिल मरसकोल्हे याला देण्यात आले. तसेच सहभागी सर्व बालकांकरीता श्री. मुकेश चालखोर, श्री. मधुभाऊ शहारे व सौ. प्रतिमा डुंबरे यांच्या वतीने खाऊ आणि आकर्षक भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले होते. पहिल्यांदाच झालेला हा तान्हा पोळ्यामध्ये एकूण ३६ बालकांनी सहभाग नोंदविला तसेच उपस्थित ३०० ते ४०० नगरवासीयांसाठी हा एक अविस्मरणीय सोहळा ठरला.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

error: Copy Is Not Allowed !!