गोंदिया पोलिस दलात मोठा फेरबदल : देवरीला गणेश वनारे नवे ठाणेदार, रेवचंद सिंगनजुडे एलसीबीकडे

गोंदिया : गोंदिया जिल्हा पोलिस दलात मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला असून 17 पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 च्या कलम 22(न) अन्वये जिल्हा आस्थापना मंडळाच्या शिफारशीवरून पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी हे आदेश जारी केले.

आदेशानुसार गोंदिया ग्रामीणचे पोलिस निरीक्षक रेवचंद खुशाल सिंगनजुडे यांची प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा (LCB) येथे महत्वाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर डुग्गीपारचे ठाणेदार गणेश कृष्णा वनारे यांची देवरी पोलिस ठाण्याच्या ठाणेदारपदी बदली झाली आहे.

इतर प्रमुख बदल्या अशा: रामनगरचे पोलिस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांची गोंदिया शहर, रावणवाडीचे वैभव पवार यांची गोंदिया ग्रामीण, आमगावचे तिरुपती राणे यांची रामनगर येथे बदली झाली. नियंत्रण कक्षाचे रामदास शेवटे रावणवाडी, वाचक शाखेचे रवि नागोसे सालेकसा तर निळकंठ कुकडे यांची आमगाव येथे नियुक्ती झाली आहे.

महिला पोलिस ठाणे दावणीवाडाच्या निरीक्षक वैशाली ढाले यांची गोरेगाव, अर्जुनी मोरगावचे कमलेश सोनटक्के यांची डुग्गीपार, केशोरीचे मंगेश काळे यांची अर्जुनी मोरगाव येथे बदली झाली आहे. गोरेगावचे सपोनि प्रशांत भुते दावणीवाडा, मुरकुटडोहचे चेतन ढेकणे केशोरी, एलसीबीचे धीरज राजुरकर गंगाझरी तर गंगाझरीचे सुधीर वर्मा यांची बीडीडीएस पथकात नियुक्ती झाली. सपोनि प्रणिल पाटील वाचक शाखेत तर उपनिरीक्षक निलकमल लिल्हारे यांची दावणीवाडा येथे बदली झाली आहे.

बदली झालेल्या सर्व अधिकाऱ्यांनी तातडीने नव्या ठिकाणी रुजू होऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें