आजोबा व तीन वर्षीय नातू गंभीर जखमी; जांभूळपाणी-मुंडीपार फाटा येथील भीषण अपघात
गोंदिया ( गोरेगांव ) : गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार फाटा परिसरातील पेट्रोल पंपाजवळ सोमवारी (दि. ०२ नोव्हेंबर २०२६) सकाळी ९ वाजेच्या सुमारास एका भीषण अपघातात दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे पती आणि तीन वर्षाचा नातू गंभीर जखमी झाले आहेत.गीता मनोहर राऊत (वय ५३) असे मृत महिलेचे नाव आहे. तर त्यांचे पती मनोहर बुधा राऊत (वय ५४) आणि तीन वर्षाचा नातू ध्रुव सोमेश्वर राऊत अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.राऊत कुटुंबातील हे तिघे सदस्य दुचाकीने प्रवास करत असताना जांभूळपाणी-मुंडीपार फाटा येथील पेट्रोल पंपाजवळ आले असता हा अपघात घडला. पोलीस वाहनांच्या ताफ्यातील एका वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की, गीता राऊत यांचा घटनास्थल-याच जागी मृत्यू झाला.
या अपघातात गंभीर जखमी झालेला तीन वर्षीय नातू ध्रुव याला पुढील उपचारासाठी गोंदिया येथील केटीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले आहे. तसेच, मनोहर राऊत यांच्यावर गोरेगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या दुर्घटनेमुळे राऊत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अपघात नेमका कसा घडला, याचा घटनाक्रम आणि जबाबदारी याबाबत अजून अधिकृत स्पष्टता झालेली नाही. गोरेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.








