देवरी हद्दीत चालत्या कंटेनरमधून ३ लाखांचे एलईडी टीव्ही चोरट्यांनी लांबवले

– एनएच ५३ वरील शिरपूर चेक पोस्ट जवळील घटना; ८६ एलजी टीव्हीवर चोरट्यांचा हात

गोंदिया ( देवरी ) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील शिरपूर चेक पोस्टजवळ उभ्या असलेल्या कंटेनर ट्रकच्या मागील पाल्याचा लॉक तोडून तब्बल ३ लाख रुपये किमतीचे ८६ नग एलईडी टीव्ही चोरट्यांनी लांबवल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी देवरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अदालत सुरेन्द्र रॉय (वय २६, रा. मोहम्मदौर, ता. पौहीआर, जि. वैशाली, राज्य बिहार) हे त्यांच्या ताब्यातील कंटेनर ट्रकमध्ये (क्र. एलजी कंपनीचे ३२ इंच एलईडी टीव्ही भरून कामधेनु फाइल करिअर ट्रान्सपोर्ट, राजनगाव (पुणे) येथून कलकत्ता येथे राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ ने जात होते. 
दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ च्या रात्री ११:०० वाजता ते दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ च्या सकाळी ६:०० वाजण्याच्या दरम्यान, एनएच ५३ वरील आरटीओ चेक पोस्ट शिरपूरपासून पूर्व दिशेला ८ किमी अंतरावर फिर्यादीने ट्रक थांबवून मागील पल्ला चेक केला. यावेळी कंटेनरच्या मागील पाल्याचा लॉक कुणीतरी अज्ञात चोरट्याने तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. 
कंटेनरमध्ये तपासणी केली असता, त्यातील १५८ एलईडी टीव्हीपैकी तब्बल ८६ नग एलजी कंपनीचे ३२ इंच टीव्ही (अंदाजे किंमत ३,००,००० रुपये) गायब असल्याचे दिसून आले. फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून देवरी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध कलम ३०५ बीएनएस अन्वये गुन्हा नोंद केला आहे. 
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. वनारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकेश राठोड हे करत आहेत. महामार्ग व परिसरातील चोरीच्या वाढत्या घटनांमुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

error: Copy Is Not Allowed !!