गोंदिया ( चिचगड ) : चिचगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. मौजा-पाऊलझोला फाट्यावरून विनापरवाना अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून ३,८४० रुपये किमतीचा मुदमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पो.हवा. नितीन दशरथराव शिरपुरकर (नेमणूक पो.स्टे. चिचगड) यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. ०२ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १९:४५ ते २०:१५ वाजे दरम्यान मौजा-पाऊलझोला फाटा (पूर्व दिशेला सुमारे ०८ किमी अंतर) येथे ही कारवाई करण्यात आली.
आरोपी अमर कवडुजी मेश्राम (वय ३६ वर्षे, रा. चिचगड, ता. देवरी, जि. गोंदिया) हा त्याच्या ताब्यातील प्लास्टिक बोरीमध्ये विना पास-परवाना अवैधपणे देशी दारू बाळगून वाहतूक करताना आढळला. त्याच्याकडून १८० मिली. क्षमतेचे प्रत्येकी ८० रुपये मूल्याचे एकूण ४८ नग देशी दारूचे पव्वे, असा एकूण ३,८४० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी फिर्यादी पो.हवा. नितीन शिरपुरकर यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध कलम ६५(ई), ७७(अ) मदाका अन्वये गुन्हा नोंदवून तपासात घेण्यात आला आहे. तसेच आरोपीस कलम ३५(३) भाना.सु.स २०२३ प्रमाणे सूचनापत्रावर सोडण्यात आले असून, पुढील तपास पो.हवा. बाळकृष्ण राऊत करत आहेत.









