देवरीत सुपर 30 टीमच्या वतीने विजयादशमी सोहळा उत्साहात संपन्न; ५ हजारांवर नागरिकांची उपस्थिती

– ६१ फूट उंच रावण दहन आणि आतिशबाजी ठरली मुख्य आकर्षण
– छत्तीसगडची रामलीला झांकी व महाकाल-देवीच्या नाटिकेने वेधले लक्ष

गोंदिया ( देवरी ) : प्रत्येक वर्षाप्रमाणे यंदाही देवरी शहरात ‘दशहरा उत्सव समिती’ आणि ‘सुपर 30’ टीमच्या विद्यमाने विजयादशमीचा सोहळा अत्यंत भव्य आणि ऐतिहासिक स्वरूपात साजरा करण्यात आला. येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या मैदानावर आयोजित या महा-सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी देवरी शहर आणि परिसरातील ग्रामीण भागातून तब्बल ४ ते ५ हजार नागरिकांचे जनसैलाब लोटले होते.
वर्षभरातून एकदा होणाऱ्या या भव्य कार्यक्रमाची जय्यत तयारी सुपर 30 टीमने केली होती. संध्याकाळी ७ वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण:

  • भव्य रावण दहन: यावर्षीच्या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ६१ फूट उंच असलेला राक्षसी रावण होता. डिजिटल आतिशबाजीच्या मध्यरात्रीच्या जल्लोषात या महाकाय पुतळ्याचे दहन करण्यात आले, ज्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
  • छत्तीसगडची रामलीला झांकी: धुकेश्वरी माता मंदिर, देवरी येथून खास छत्तीसगड राज्याबाट पाचारण करण्यात आलेल्या कलाकारांची भव्य रामलीला झांकी काढण्यात आली. ही झांकी संपूर्ण शहरातून वाजतगाजत मुख्य मैदानवर पोहोचली.
  • महाकाल व देवींची नाटिका: भगवान महाकाल आणि आदिशक्ति देवींच्या जीवनावर आधारित विशेष धार्मिक नाटिकेने उपस्थितांच्या अंगावर काटा आणला आणि सर्वांचे मन जिंकले.
  • लावणी नृत्य व खाद्यपदार्थ स्टॉल्स: पारंपारिक लावणी नृत्याच्या बहारदार सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तसेच, लहान मुलांसाठी आणि कुटुंबीयांसाठी आकर्षक खाद्यपदार्थांचे (फूड) स्टॉल्स लावण्यात आले होते.

गर्दीचा ओघ लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, ज्यामुळे हा सोहळा अत्यंत शांततापूर्ण व दिमाखात पार पडला.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

error: Copy Is Not Allowed !!