पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी गोंदिया जिल्हा सज्ज; 22176 मतदार बजावणार हक्क*

२३ ऑक्टोबरला मतदान; ओळखपत्र सोबत ठेवण्याचे आवाहन

गोंदिया : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गोंदिया जिल्ह्यात प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून, गुरुवार, २३ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्यातील एकूण 22, हजार 176 मतदार या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील अंतिम मतदार आकडेवारीनुसार, एकूण मतदारांमध्ये 13 हजार 965 पुरुष आणि  8 हजार 211 महिला मतदारांचा समावेश आहे. निवडणूक प्रक्रियेत सर्व पात्र मतदारांना सहभागी होता यावे, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक तयारी करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील ३9 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे. यासाठी 180 अधिकारी कर्मचारी नियुक्त केलेले आहेत. आवश्यक पोलीस बंदोबस्त केलेला आहे.

ओळखपत्र सोबत ठेवण्याचे आवाहन
मतदानाच्या दिवशी पात्र पदवीधर मतदारांनी निर्धारित वेळेत आपल्या मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावावा. मतदानासाठी येताना आवश्यक वैध ओळखपत्र सोबत आणावे, असे आवाहन  निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
लोकशाही प्रक्रियेत मतदानाला महत्त्वाचे स्थान असून, सर्व पात्र मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क जबाबदारीने बजावावा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

error: Copy Is Not Allowed !!