भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे ऑनलाईन अर्ज सादर करण्यास 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

गोंदिया : सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना https//hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन करण्यात आलेली आहे. सदर योजनेचे अर्ज ऑनलाईन पोर्टलद्वारे स्विकारण्याची कार्यवाही सुरु झालेली आहे. अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये काही अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरु आहेत. करीता सन 2024-25 या चालु वर्षासाठी स्वाधार योजनेचे अर्ज ऑनलाईन सादर करण्याकरीता 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

        अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन पोर्टलद्वारे दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही अशा सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वाधार योजनेसाठी वर्ग होणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेसाठी नव्याने अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही.

        तरी जिल्ह्यातील स्वाधार योजनेकरीता पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले नसल्यास https//hmas.mahait.org या पोर्टलवर परिपुर्ण कागदपत्रासह 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावे, असे समाज कल्याण सहायक आयुक्त, गोंदिया यांनी कळविले आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें