मनोहरभाई पटेल विद्यालय देवरी येथे मतदान जनजागृती

गोंदिया : पंचायत समिती देवरी अंतर्गत मनोहरभाई पटेल विद्यालय देवरी येथे इयत्ता अकरावी  व बारावीच्या विद्यार्थ्यांना स्वीप कार्यक्रमाच्या जनजागृती अंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सदर विद्यार्थ्यांमधून दोन विद्यार्थ्यांनी नवीन दहा मतदारांची नोंदणी केल्यामुळे जिल्हाधिकारी गोंदिया यांनी या दोन विद्यार्थ्याचा गौरव केला त्यांचे सुद्धा याप्रसंगी स्वागत व अभिनंदन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य मेश्राम, स्वीपची संपूर्ण टीम तसेच जवळपास 1100 ते 1200 विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते.

         स्वीप कार्यक्रमाबाबत प्रामुख्याने मतदानाची वेळ आणि शंभर टक्के मतदान करण्याबाबतची बाब संबंधित विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन स्वीप नोडल अधिकारी तथा गटविकास अधिकारी पंचायत समिती देवरी जी.टी. सिंगनजुडे व त्यांच्या टीमने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला. हा संदेश 22 ऑक्टोबर 2024 रोजी विद्यार्थ्यांमार्फत देवरी तालुक्यातील मतदारांना देण्यात आला.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें