मौजा धमदीटोला ता. देवरी, वनपरिक्षेत्र दक्षिण देवरी येथे वन्यप्राणी बिबट जेरबंद

गोंदिया ( देवरी ) : दि. 28/09/2025 रोजी सकाळी 7.00 वाजता श्री. के.जे. जायेभाये बिटवनरक्षक पळसगाव यांनी दुरध्वनी संदेशाद्वारे वनपरिक्षेत्र दक्षिण देवरी सहवनक्षेत्र बोंडे नियतक्षेत्र पळसगाव मधील धमदीटोला गावातील रहीवासी श्री. सुनेटी जगन कोराम रा. धर्मादिटोला यांच्या घरी पाहुणी म्हणुन आलेली बहीन श्रीमती. प्रभाबाई शंकर कोराम वय 49 वर्ष रा. आलेवाडा ता. देवरी. जि. गोंदिया यांच्यावर पहाटे 1.00 ते 2.00 वाजेच्या दरम्यान वन्यप्राणी बिबटने हल्ला करून ठार केले आहे. अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी दक्षिण देवरी यांना मिळताच तात्काळ वरीष्ट अधिकारी यांना सदर घटनेबाबत अवगत करुन त्यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी दक्षिण देवरी हे आपल्या अधिनीस्त सर्व क्षेत्रीयकर्मचारी यांना सोबत घेवुन घटनास्थळी पोहचुन घटनेची मौका पाहणी करुन मौका पंचनामा नोंदविला. व त्यांनतर मा. संजयजी पुराम, आमदार, देवरी विधानसभा क्षेत्र श्री. अभय डोंगरे, अप्पर पोलीस अधिक्षक गोंदिया, कु. कविता गायकवाड, उपविभागीय अधिकारी देवरी, श्री. प्रमोद माडामे उपविभागीय पोलीस अधिकारी आमगांव देवरी, श्री. विजय धांडे सहायक वनसंरक्षक (तेंद्र व कॅम्पा) व श्री. सचिन डोंगरवार सहायक वनसंरक्षक (राहयो व वन्यजीव) गोंदिया वनविभाग गोंदिया यांच्या उपस्थित घटनास्थळी सदर मृत महिलेच्या पतीला आर्थीक सहानुग्रह म्हणुन 100000/- (अक्षरी – एक लाख रुपये) रोख रक्कम देण्यात आले.

त्यानंतर सदर मृत महिलेचे मृतदेहाचे शवविच्छेदन करुन त्यांचे स्वगावी आलेवाडा येथे नेवुन अंतविधी क्रिया पुर्ण करण्यात आली.

मौजा – धमदीटोला ता. देवरी. जि. गोंदिया येथे श्रीमती. श्रीलक्ष्मी.ए. वनसंरक्षक नागपुर व श्री. पवनकुमार जोंग, उपवनसंरक्षक गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली सहावनसंरक्षक (तेंदु व कॅम्पा) व सहायक वनसंरक्षक (राहयो व वन्यजीव) तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी दक्षिण देवरी यांच्या उपस्थित धमदीटोला या गावामध्ये घडलेल्या घटनेच्या जबाबदार वन्यप्राणी बिबटला रात्री 8.00 वाजता Rapid Recue Team गोंदिया वनविभाग, Rapid Recue Team साकोली, सर्व क्षेत्रीय कर्मचारी यांना सदर वन्यप्राणी बिबट जेरबंद करण्यास यश आले. त्यानंतर सदर वन्यप्राणी बिबटला प्राणी संग्रालय गोरेवाडा नागपुर येथे पाठविण्यात आले. या कार्यवाही करीता स्थानीक ग्रामस्त तसेच श्री. प्रमाद मडामे, उपविभागी पोलीस अधिकारी (अती), श्री. जनार्धन हेगडकर, ठाणेदार, चिचगड कु.योगीता चापले, ठाणेदार, नवेगावबांध श्री. राठोड, ठाणेदार श्री. आंदे, ठाणेदार बोंडे, श्री. प्रविण टांगे, ठाणेदार देवरी पोलीस प्रशासनाचे मोलाचे सहकार्य लाभले.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें