गोंदिया ( देवरी तालुका ) ; उचेपुर गावात बार (दारुचे दुकान) सुरू झाल्याने उचेपुर येथील नागरिक संतप्त झाले आहेत. दारूमुळे अनेकांच्या सुखी संसाराला नख लागले आहे. युवापिढी बर्बाद होते. सामाजिक स्वास्थ बिघडते. त्यामुळे उचेपुरवाशी बार समोरच अनेक दिवसापासुन ठिय्या आंदोलन करीत आहेत. संबधीत व्यक्तीला बारची परवानगी उचेपुर गाव हद्दीत कसी दिली गेली. त्याचा परवाना जो पर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत बार समोर चोविस तास ठिय्या आंदोलन करनार असल्याचे गावकर्यांचे म्हणने आहे. राज्यउत्पादनसुल्क विभागाने परवानगी दिली व उचेपुर वाशीनां बारवर कारवाही केली असल्याची खोटी माहिती दिली गेली असाही आरोप उचेपुर गावातील नागरीकांनी केला आहे.
ककोडी ग्रामंपचायत हद्दीत येत असलेल्या उचेपुर गावात गावकर्यांची परवानगी नसतानां कुनाच्या परवानगीने येथे बार & रेस्टॉरेन्टं करीता परवानगी देन्यात आली ? ककोडी येथे दोन देशी दारुची दुकाने असुनसुद्धा गावातील नागरीकांचा संसार उद्धवस्त करन्याचा काम परवाना देऊन संबधीत विभाग करीत असल्याचा आरोप उचेपुर वाशीयांनी केला आहे. गावांतील महिलांच्या पुढाकाराने हि बार दुकान बंद करण्यात आली. ही दुकान सुरू करण्याचे प्रयत्न बरेचदा झाले. परंतु, महिलांच्या बार समोर मांडलेल्या चोविस तास ठिय्या आंदोलनाने बार मालकाला अजुनही यश मिळाले नाही . मात्र, काही किलोमीटर अंतरावर ककोडी येथे दोन देशी दारूचे दुकाने आहेत.
हि बार दारु दुकान उचेपुर येथुन हलविन्याची अर्ज उचेपुर वाशीयांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग, जिल्हाधिकारी, गोंदिया यांच्याकडे केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांनी उचेपुर येथील बार अँड रेस्टारेंटच्या दुकानाला परवानगी दिली आहे. पण गावातील महिलांनी दिलेल्या अर्जाची अजुनही दखल घेतली गेली नाही.
नागरिकांच्या संतप्त भावनांची तात्पुरती घेतली दखल…
उचेपुर येथे बार & रेस्टॉरेटं दुकान सुरू झाल्यानंतर गावकऱ्यांमध्ये संताप उसळला. दुकान सुरू झाल्याची आणि नागरिकांच्या संतप्त भावनांची माहिती तालुका व जिल्हास्तरावरील सर्व अधिकाऱ्यांना व जनप्रतिनीधीनां देण्यात आली. परंतु अजूनही उचेपुर वाशीयांची दखल घेन्यात आलेली नाही. त्यावर तात्पुरती दखल घेतली गेल्याचे फक्त तोडीं सागंत सगळे बार मालकाची पाठराखन करीत असल्याचे गावातील नागरीकांचे म्हणने आहे.
चोविस तास महिलांच्या ठिय्या आंदोलनामुळे तात्पुरत्या स्वरूपात बार दुकान बंद….
सर्व अधिकारी आणि जनप्रतिनीधींनी देशी बार & रेस्टॉरेंट दुकान मालकाशी चर्चा केली. पंरतु काही मार्ग निघाला नसल्याने उचेपुर गावातील महिलांनी गावबंदी करत बार समोरच ठिय्या आंदोलन सुरु केला आहे. जेव्हां पर्यंत गावातील या बारचा परवाना रद्द होणार नाही तो पर्यंत उचेपुर येथील महिला बार समोर चोविस तास आदोंलन काय ठेवनार आहेत.









