प्रतापगड यात्रेसाठी बसेसचे वेळापत्रक जाहीर

गोंदिया : जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ‘प्रतापगड’ येथे महाशिवरात्री निमित्त विविध भागातून दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक यात्रेत सहभागी होत असतात. प्रतापगड यात्रेचे आयोजन दि.15 ते 20 फेब्रुवारी 2026 दरम्यान करण्यात आलेले आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी साकोली आगाराकडून पुरेशा बसेसची सोय करण्यात आली आहे. तर पवनी व गोंदिया आगाराकडूनही बसचे नियोजन करण्यात आले आहे. या बसेसद्वारे भाविकांना प्रतापगड येथे घेऊन जाणे व परत आणण्याची सोय केली जाणार आहे, असे साकोली आगार व्यवस्थापक सचिन आगरकर यांनी कळविले आहे.
                        असे आहे बसचे वेळापत्रक
       साकोलीवरुन प्रतापगडसाठी (मार्गे अर्जुनी/मोगाव) : सकाळी 6.00 वाजता, सकाळी 7.00 वाजता, सकाळी 8.00 वाजता, सकाळी 9.00 वाजता, सकाळी 10.00 वाजता, सकाळी 11.00 वाजता, दुपारी 12.00 वाजता, दुपारी 1.00 वाजता, दुपारी 2.00  वाजता, दुपारी 3.00 वाजता, दुपारी 4.00 वाजता, सायंकाळी 5.00 वाजता.
       पवनी येथून प्रतापगडसाठी (मार्गे अड्याळ, लाखांदूर, अर्जुनी/मोरगाव) : सकाळी 8.00 वाजता, सकाळी 9.00 वाजता, सकाळी 10.00 वाजता.
       पवनीवरुन प्रतापगडसाठी (मार्गे आसगाव, विरली, लाखांदूर) : सकाळी 9.00 वाजता, सकाळी 10.00 वाजता. 
       गोंदिया येथून प्रतापगडसाठी (मार्गे कोहमारा, अर्जुनी/मोरगाव) : सकाळी 9.45 वाजता, सकाळी 10.45 वाजता जाणार आहे, असे आगार व्यवस्थापकाकडून कळविण्यात आलेले आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें