अस्वच्छता – घाण व दुर्गंधीचा सामणा ; कोकडी येथील मटन मार्केटमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात..

परिसरात सतत अस्वच्छता – घाण व दुर्गंधी…

गोंदिया, देवरी (ककोडी) :  स्थानिक ककोडी येथ दर मंगळवारी आठवडी बाजार भरतो ज्यात ककोडी – उचेपुर मार्गावर ककोडी गावातील वस्ती असलेल्या ठिकाणीच संबधीत बाजार ठेकेदाराकडुन मटन मार्केट भरविल्या जातो ज्यामुळे परिसरात सतत अस्वच्छता घाण व असहय्य दुर्गंदी राहत असल्याने परीसरातील नागरीकांसह त्या रसत्यानी ये-जा करनार्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे सदर मटन मार्केट गावाबाहेर हलविण्यात यावे अशी मागणी परीसरातील नागरीकानीं केली आहे.

ककोडी हे देवरी तालुक्यातील तिसरे मोठे आठवडी बाजार असुन मंगळवारी ककोडी गावच्या मुख्य ककोडी – उचेपुर   रसत्यावर आठवडी बाजार भरविल्या जातो. याच मुख्य रसत्यावर मटन मार्केट आहे, सदर मटन मार्केट मध्यवस्तीत असून या परिसरात सतत घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य राहते त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. सदर मटन मार्केट  असलेल्या परिसरात मोठी लोकवस्ती आहे. त्याच परिसरात मटन मार्केट मधील मांस तुकडे व इतर घाण टाकली जात असल्यामुळे याच परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे. या मटन मार्केटच्या घाणीमुळे व दुर्गंधी मुळे  परीसरातील नागरीक व ककोडी – उचेपुर रसत्यानीं ये-जा करनार्या नागरीकांना नाकावर रुमाल ठेऊन ये-जा करावे लागत आहे. ज्यामुळे परीसरातील दुकानदारासह येथे येणारे ग्राहक व अवागमन करणारे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे सदरचे मटन मार्केट ककोडी – उचेपुर मार्गावरुन  हलवून अन्यत्र गावाबाहेर स्थलांतरीत करावे अशी नागरिकांणी मागणी करीत आहे.

नागरीकांच्या लेखी तक्रारीला केराची टोपली….

ककोडी – उचेपुर मार्गावरील मटन मार्केटच्या सततच्या असहय्य दुर्गंधीमुळे होत असलेल्या असहय्य त्रासामुळे  परिसरातील नागरीक यशवंत वालदे, रवि ईगंडे, रामेश्वर मीरी, राजु गंगाकचुर, ममता बैस, मनिष जैन, राणी बैस, सोनु ईगंळे, अनुप ठाठमुरा, लक्षमण शाहु, संजय ईगंळे, मनोज मेश्राम, तोरण ईगंळे, प्रमण ईंगळे, ओमकार दास, अशोक ठाकरे, मुकेश ईगंळे, सागर सुंदर, हुकुमं ईंगळे, कुलदिप ठाकरे, धनेस ठाकरे व ईतर नागरीकांनी स्थानीक ग्रामंपचायत, आरोग्यविभाग, चिचगड पोलिस्टेसन , संबधीत बाजार ठेकेदार व जिल्हापरीषद गोंदिया यांना लेखी तक्रार दिली आहे. तक्रार देऊन महिने लोटले तरी स्थानींक ककोडी येथील सरपंच संबधीत आरोग्य विभाग ईतर विभाग यांना नागरीकांनी दिलेल्या तक्रारीला केराची टोपली दाखवत जाणुन दुर्लक्ष केलागेला असल्याचा आरोप तक्रारदारांकडुन होत असुन आमंच्या आरोग्याशी खेळले जात असल्याचे तक्रारदारांचे म्हणने आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें