पोलीस स्टेशन देवरी हद्दीत अवैध दारु विक्री तसेच गंभीर गुन्हे करणा-या ईसमांस केले हद्दपार.

गोंदिया ( देवरी ) ; गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस स्टेशन देवरी अंतर्गत मा. श्री पोलीस अधीक्षक गोरख भामरे साहेब, यांचे सुचनेप्रामणे मा. श्री अभय डोंगरे सा. अपर पोलीस अधिक्षक गोदिया कँम्प देवरी, मा. श्री विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधीकारी सा. उपविभाग देवरी, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षण प्रविण डांगे पोलीस स्टेशन देवरी यांनी पो.स्टे. हदद्दीतील ईसम नामे खुशाल कैलास राऊत वय- २१ वर्ष, रा-वार्ड क्र.१७ देवरी, ता-देवरी , जि.गोंदिया यांचे विरुध्द पोलीस स्टेशन देवरी येथे सन- २०२४ ते सन-२०२५ पर्यंत अवैध्द दारु विक्री करणे तसेच महीलांची छेडखानीं करणे असे गुन्हे केल्याने त्याचे पासुन बहुतांश कुट्रंब दारुचे व्यसनामुळे उध्वस्त झाले.

तसेच समाजातील महिलांच्या व विद्यार्थाच्यां मनात असुरक्षितता भावना तसेच भितीचे वातावरण निर्माण झाले असल्याने सदर ईसमाबाबत कलम-५६(अ)( ब) मपोका अन्वये हददपार करण्याचा प्रस्ताव तयार करुन मा. कविता गायकवाड, उपविभागीय दंडाधिकारी सा. देवरी यांचेकडे सादर केले असता त्यांनी सदर प्रकरणाची चौकशी व सुनावणी करुन ईसम नामे खुशाल कैलास राऊत वय-२१ वर्ष, रा-वार्ड क्र. १७ देवरी, ता-देवरी , जि. गोंदिया यास उपविभागातील देवरी, आमगाव, सालेकसा तालुक्यातुन ०६ महिण्याकरीता हदपार करण्याचे आदेशित केल्याने सदर इसमास आदेशाची प्रत तामील करुन दिनांक-१५/०४ /२०२६ रोजी उपविभागातील देवरी, आमगाव, सालेकसा तालुक्यातुन हददपार करण्यात आले आहे. पो. नि. प्रविण डांगे सा. यांचे मार्गदर्शणाखाली सदर कारवाई करीता पो. हवा. धर्मराज कटरे/१५०८, मपोशि निता कांबळे/ २२७२ पोलीस स्टेशन देवरी, यांनी निर्गती केली आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें