गोंदिया (देवरी,शिरपुर) : शिरपूर येथील बाघनदीमध्ये प्रेम सिंग (वय 34, राहणार बरेली, उत्तर प्रदेश) हे वाहन चालक नदीपात्रात गेले असता पाण्यात बुडाल्याची घटना घडली. घटनेची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाला मिळताच तात्काळ शोध व बचाव पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले.
शोधमोहीम राबवून संबंधित इसमाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.









