बेरोजगारांसाठी मोबाईल रिपेरिंग व सी.सी.टीव्ही कॅमेरा इंस्टॉलेशन व्यवसायाचे मोफत प्रशिक्षण

गोंदिया : भारत सरकार ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे ग्रामीण भागातील बेरोजगार युवक-युवतींना स्वयंरोजगार करण्यासाठी ज्ञान व कौशल्य उपलब्ध व्हावे या उद्देशाने देशाच्या प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी अग्रणी जिल्हा बँकेच्या माध्यमातून ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI) ची सुरुवात करण्यात आलेली आहे.
            गोंदिया जिल्ह्यात बँक ऑफ इंडिया अग्रणी जिल्हा बँकेच्या वतीने द्वारा- वाहने पॅलेस, हरिणखेडे पेट्रोल पंप जवळ तिरोडा रोड, कुडवा, गोंदिया येथे 2011 पासून कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून देण्यात येणारे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असुन संस्थेमध्येच मोफत निवास, भोजन, चहा व नाश्त्याची सोय उपलब्ध करून दिली जाते.
            प्रशिक्षणादरम्यान मोफत गणवेश,स्टेशनरी व प्रशिक्षण साहित्य उपलब्ध करून दिले जात असून प्रशिक्षणामध्ये संबंधीत व्यवसायाचे 75% प्रात्यक्षिक व 25% थेअरी प्रशिक्षण दिले जाते. त्यासोबतच 21 व्या शतकाचे व्यावसायिक कौशल्य उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य, मार्केटिंग कौशल्य, डिजिटल कौशल्य, संगणक कौशल्य व पर्यावरण कौशल्य अशा प्रकारचे कौशल्य प्रशिक्षणार्थीमध्ये विकसीत करून त्यांना व्यवसाय करण्यासाठी तयार केले जाते.
            मे महिन्यामध्ये पुढीलप्रमाणे प्रशिक्षण आयोजित करण्याचे निश्चित केले आहे. मोबाईल रिपेरिंगचे प्रशिक्षण दि.11 मे ते 10 जून 2026 या कालावधीत होणार असून सी.सी.टीव्ही कॅमेरा इंस्टॉलेशनचे प्रशिक्षण दि.17 मे ते 29 मे 2026 या कालावधीत होणार आहे.
           वरील प्रशिक्षण हे ग्रामीण भागातील 18 ते 45 वयोगटातील बेरोजगार युवक व युवतींसाठी नि:शुल्क असून प्रशिक्षणार्थींसाठी संस्थेमध्ये मोफत राहण्याची व जेवणाची सोय उपलब्ध असणार आहे. त्याकरिता गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इच्छुक उमेदवारांनी जास्तीत जास्त संख्येने व लवकरात लवकर संस्थेत येऊन आपले नाव नोंद करावेत.
           ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांनी या संधीचा लाभ घ्यावा व तांत्रिक प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगार करावा. ग्रामीण भागातील बेरोजगारांना प्राधान्य देण्यात येइल. इच्छुक उमेदवारांनी आपले आवेदन पत्र निदेशक, स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थान गोंदिया, वाहने पॅलेस हरिणखेडे पेट्रोलपंप जवळ, तिरोडा रोड, कुडवा (गोंदिया) येथे त्वरित जमा करावे.
          अधिक माहितीसाठी 9764087919/ 8698140105/ 9834895077/ 8830249205 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे निदेशक अब्दुल वसीम यांनी केले आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें