गोंदिया ( देवरी ) : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच कोणताही अप्रिय प्रकार घडू नये, यासाठी देवरी पोलिस आणि महामार्ग वाहतूक पोलिस (हायवे ट्रॅफिक पोलिस) डुग्गीपार यांच्या संयुक्त विद्यमाने आज शुक्रवारी, १४ ऑगस्ट रोजी देवरी शहरातील चिचगड रोडवर विशेष नाकाबंदी व वाहनांची तपासणी मोहीम राबवण्यात आली.
१५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिस अधिक्षक गोंदिया , अप्पर पोलिस अधिक्षक , उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी यांच्या आदेशाने व देवरी पोलिस्टेसनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात ही धडक कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान मुख्यत्वे मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर (Drink and Drive) लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. चिचगड रोड व देवरी शहरातील मुख्य मार्गा वरून ये-जा करणाऱ्या संशयित दुचाकी व चारचाकी वाहनांना थांबवून चालकांची ‘ब्रीथ ॲनालायझर’ उपकरणाद्वारे तपासणी करण्यात आली. तसेच वाहनांची कागदपत्रे, लायसन्स आणि इतर नियमांचीही तपासणी करण्यात आली. हि कारवाही देवरी तालुक्यासर गोंदिया जिल्ह्यातील संपुर्ण तालुक्यात राबवीली जात आहे.
स्वातंत्र्यदिनाचा सण निर्विघ्न आणि शांततेत पार पडावा, यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. ऐन सणाच्या तोंडावर अचानक झालेल्या या नाकाबंदीमुळे मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. या संयुक्त मोहिमेत देवरी पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी आणि हायवे ट्रॅफिक पोलिस डुग्गीपारचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. आगामी काळातही वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आणि दारू पिऊन वाहने चालवणाऱ्यांवर अशीच कडक कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.







