रेल्वे स्टेशन जवळील ‘राधिका’ लॉजवर पोलिसांची धाड; देहविक्रीचा अड्डा उध्वस्त, ४ महिलांची सुटका

गोंदिया : शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या ‘राधिका’ लॉजवर पोलिसांनी छापा टाकून चालविल्या जात असलेल्या देहविक्रीच्या अड्ड्याचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी लॉज चालकाला ताब्यात घेतले असून ४ पीडित महिलांची सुटका केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया रेल्वे स्टेशनजवळील राधिका लॉजमध्ये अनैतिक मानवी वाहतूक आणि वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने पंचांसमक्ष लॉजवर अचानक धाड टाकली.
या कारवाईदरम्यान लॉज चालक व मालक जगदीश भामनानी (वय ५४ वर्षे, रा. हेमू कॉलनी चौक, यादव चौक, गोंदिया) हा पीडित महिलांकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून ४ पीडित महिलांची सुटका केली.
याप्रकरणी आरोपी जगदीश भामनानी व पीडित महिलांना पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. गोंदिया शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद (अप.क्र. ८०७/२०२६) कलम १४३(२)(३) बी.एन.एस. सहकलम ३, ४, ५ अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
यांच्या मार्गदर्शनात झाली कारवाई:
सदर धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे व अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षल सेलचे पोलीस निरीक्षक प्रमोद भातनाते, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या म.स.पो.नि. मनिषा निकम, स.फौ. जितेंद्र मिश्रा, पो.हवा. बलराज लांजेवार, पो.हवा. रूपेश सुखदेवे, म.पो.हवा. शिल्पा बडवाईक, पो.शि. रविंद्रकुमार मेश्राम, म.पो.शि. मंजु बागडे आणि चा.म.पो.शि. सुरेखा मेंढे यांच्या पथकाने केली.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

error: Copy Is Not Allowed !!