देवरी वनविभागाची धडक कारवाई! साडेसहा लाखांहून अधिक किमतीचे अवैध सागवान आणि वाहन जप्त.

गोंदिया ( देवरी ) : उत्तर देवरी वनक्षेत्राच्या पथकाने रात्रीच्या सुमारास गस्तीदरम्यान मोठी कारवाई करत अवैध सागवान लाकूड तस्करीचा पर्दाफाश केला आहे. या धडाकेदार कारवाईत वनकर्मचाऱ्यांनी १ लाख ६ हजार ८०९ रुपये किमतीचे अवैध सागवान लाकूड आणि एक पिकअप वाहन जप्त केले आहे. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन वाहनचालक घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाला. 

नक्की काय घडले?
दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री अंदाजे २:०० वाजताच्या सुमारास गस्तीवर असलेल्या वनकर्मचाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली की, MH 36 AA 4397 क्रमांकाच्या पिकअप वाहनातून अवैध रित्या सागवान लाकडाची वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे सतर्क वनकर्मचाऱ्यांनी तातडीने सापळा रचून सदर वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला.

चालकाने वाहन पळून नेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, परंतु वनकर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाहन अखेर ताब्यात घेण्यात आले. वाहनाची झडती घेतली असता त्यात सागवान जातीचे एकूण ६ नग आढळून आले. जप्त केलेल्या लाकडाचे एकूण घनमीटर २.०८४ असून त्याची बाजारातील अंदाजित किंमत १,०६,८०९ रुपये इतकी आहे. 

आरोपी पसार, कसून शोध सुरू
कार्रवाईदरम्यान वाहनचालक तथा आरोपी अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून फरार झाला. वनविभागाकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. या प्रकरणी वाहन व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, भारतीय वन अधिनियम १९२७ अंतर्गत वनगुन्हा क्र. ०१/२०२६/९८५४४ (दिनांक ०५/११/२०२६) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. 

अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक
सदर यशस्वी कारवाई श्री. पवनकुमार जोंग (उपवनसंरक्षक, गोंदिया) व श्री. एस. एम. डोंगरवार (सहाय्यक वनसंरक्षक, गोंदिया) यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती एस. व्ही. धोटे-मिश्रा (वनक्षेत्र अधिकारी, देवरी) यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

या धडक कारवाईत श्री. जी. आय. लांजेवार (क्षेत्र सहाय्यक, देवरी), वनरक्षक श्री. एस. यु. चव्हाण, श्री. जे. एस. केंद्रे, श्री. एस. टी. बम्हमणावत, श्री. ए. जी. कानगुले, श्री. व्ही. एस. मेथलवाड, श्री. डी. बी. केंद्रे तसेच लाखनी वनपरिक्षेत्राचे वनपाल मेश्राम व वनरक्षक बाळासाहेब निश्चित आणि इतर वनकर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. वनविभागाच्या या धडक कारवाईमुळे लाकूड तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

error: Copy Is Not Allowed !!