देवरी तालूका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी मनोहरभाई पटेल महाविद्यालय देवरी शाळेचे प्रथम क्रमांकाचे यश प्राप्त विद्यार्थी व मार्गदर्शक प्रा.शुभांगी ध.गजभिये यांच्या अभिनंदन

गोंदिया ( देवरी ) :  दिंनाक 22.12.2025 रोज सोमवार ला देवरी तालूका विज्ञान प्रदर्शनी ही के.एस.जैन महाविद्यालय देवरी येथे आयोजित करण्यात आलेली होती. याप्रसंगी विज्ञान प्रदर्शनाचे अध्यक्षस्थानी मा.अनिल बिसेन सभापती पंचायत समिती , व प्रमुख अतिथी म्हणून मा.महेन्द्र मोटघरे गटशिक्षणाधिकारी देवरी, शहारे ताई, प्राचार्य रजिया बेग , अन्य मान्यवर यामध्ये कर्मचाऱ्यांची शिक्षक समूह, प्रयोगशाळा सहाय्यक समूह, विद्यार्थामध्ये वर्ग 5 ते 8 व 9 ते 12 अश्या विविध समुहातून विज्ञान प्रदर्शनाची आयोजन करण्यात आलेले होते. याप्रसंगी 9 ते 12 गटातून मनोहरभाई पटेल कनिष्ठ महाविद्यालय देवरी येथील प्रा.शुंभागी ध.गजभिये यांच्या मार्गदर्शनात कृतीयुक्त असलेले जागतिक स्तरावरील प्लॅस्टिक वेस्ट मँनेजमेंट याविषयावर विद्यार्थांमध्ये संशोधन शोधवृती मधून यश प्रभु मनगटे, प्रज्वल वैद्य, बिरसा मळकाम, चिराग बालक अश्या विद्यार्थांचा सहभाग होता.. यांच्या कृतीयुक्त व जागतिक विषयातील महत्व बघून उत्तम अश्या सादरीकरणामुळे देवरी तालूकात विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक पूरस्कार देण्यात आला. याकरिता सहभागी विद्यार्थांचा सत्कार व मार्गदर्शकाचे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य जी.एम.मेश्राम , सर्व शिक्षकवृंद , शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडून विद्यार्थांचे व मार्गदर्शिका प्रा.शुभांगी ध.गजभिये यांचे मनोहरभाई पटेल महाविद्यालय देवरी येथे कौतुकपर अभिनंदन करण्यात आले.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

error: Copy Is Not Allowed !!