देवरी पोलिसांची मोठी कारवाई; अवैध जनावरे वाहतूक करणारे वाहनासह 2 आरोपी ताब्यात, अंदाजे 28 जनावरे मुक्त

गोंदिया ( देवरी ) : – देवरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध जनावरे वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी ट्रकसह अंदाजे 28 जनावरे ताब्यात घेतली असून 2 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांना मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार छत्तीसगडमधील रायपूर मार्गे जनावरांची नागपूरकडे अवैध वाहतूक केली जात होती. या माहितीच्या आधारे आज सकाळी 7.30 वाजता पोलीस पथकाने देवरी हद्दीत नाकाबंदी केली.

वाहनाची तपासणी केली असता त्यात अंदाजे 28 गोवंशाची जनावरे अत्यंत कोंडाळून भरून नेत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी वाहनासह सर्व जनावरे ताब्यात घेतली आणि वाहन चालकासह 2 आरोपींना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक झिंगु मडावी,ज्ञानीलाल करंजेकर, पोलीस हवालदार, पंकज पारधी, रामराव कांदे, पोलीस शिपाई मेंढे यांच्या पथकाने केली.

ताब्यात घेण्यात आलेल्या जनावरांना वैद्यकीय तपासणीनंतर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 व संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. अवैध जनावरे वाहतूक रोखण्यासाठी अशाच प्रकारची कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

error: Copy Is Not Allowed !!