गोंदिया : जिल्ह्यातील बेरोजगारांच्या सर्व सेवा सहकारी संस्थांना कळविण्यात येते की, जिल्हा शल्यचिकित्सक, केटीएस सामान्य रुग्णालय गोंदिया यांच्या अधिनस्त असलेल्या उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथील रुग्णालय इमारतीमधील संपूर्ण साफसफाईकरिता दैनिक दर ₹588/- (पाचशे अठ्ठ्याऐंशी) प्रमाणे एकूण 03 पदे, ग्रामीण रुग्णालय चिचगड इमारतीमधील संपूर्ण साफसफाई करण्याकरिता 02 पदे तसेच ग्रामीण रुग्णालय देवरी ययेथील प्रशासकीय इमारतीत संपूर्ण साफसफाईकरिता रोजंदारी प्रमाणे 03 पदे, ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथील रुग्णालय इमारतीमधील संपूर्ण साफसफाईकरिता 02 पदे, ग्रामीण रुग्णालय आमगाव येथील प्रशासकीय इमारतीत संपूर्ण साफसफाईकरिता 02 पदे, ग्रामीण रुग्णालय रजेगाव येथील रुग्णालय इमारतीमधील संपूर्ण साफसफाईकरिता 02 पदे, ग्रामीण रुग्णालय गोरेगाव येथील प्रशासकीय इमारतीत संपूर्ण साफसफाईकरिता 02 पदे, ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी येथील रुग्णालय इमारतीमधील संपूर्ण साफसफाईकरिता 02 पदे, ग्रामीण रुग्णालय सौंदड येथील प्रशासकीय इमारतीत संपूर्ण साफसफाईकरिता 02 पदे, ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथील रुग्णालय इमारतीमधील संपूर्ण साफसफाईकरिता 02 पदे, ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथील प्रशासकीय इमारतीत संपूर्ण साफसफाईकरिता 02 पदे बेरोजगार सोसायटीमार्फत भरावयाचे आहेत. यासाठी इच्छुक संस्थांकडून वेगवेगळे स्वतंत्र प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
कामासाठी इच्छुक असलेली संस्था ही सफाईचे काम करणारी असावी. तसेच बेरोजगार सेवा सहकारी संस्था ही गोंदिया जिल्ह्यातीलच असणे आवश्यक आहे. सफाई करायची नेमणूक हे 11 महिन्याकरिता करार पद्धतीवर राहील. संस्थेकडे वाणिज्य स्थापनेचा परवाना व आयकर व व्यवसाय कराबाबतचे नोंदणी प्रमाणपत्र, लेखापरीक्षण अहवाल, सेवायोजन नोंदणी कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच संस्थेला कमीत कमी तीन वर्षाचा संबंधित कामाचा अनुभव असावा. संस्था कोणत्याही विभागांतर्गत काळया यादीत समाविष्ट नसावी. आवश्यक अटींची पूर्तता करणाऱ्या संस्था पात्र समजण्यात येतील. तथापि, कामवाटप समितीचा निर्णय अंतिम राहील.
संस्था नोंदणीस किमान सहा महिने पूर्ण झालेल्या व वरील सर्व आवश्यक अटींची पूर्तता करणाऱ्या इच्छुक संस्थांनी कामाची मागणी करणारे आपले प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत, दुसरा माळा, रूम नंबर 210, गोंदिया यांच्याकडे दिनांक 30 एप्रिल 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावे. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया यांनी कळविले आहे.








