अवैध जनावरे वाहतूक करणारा ट्रक चिचगड पोलिसांच्या ताब्यात…

5 लक्ष 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…

गोंदिया ( देवरी, चिचगड़ ) : तालुक्यातील चिचगड पोलिस स्टेशन हद्दीतील फुटाना – बोरगाव/बा. – नकटी रोडवर तिन म्हशी चारचाकी वाहन पिकपमध्ये कोंबून भरलेल्या स्थितीत चिचगड पोलिसांना शनिवारी पहाटे 4.00 वाजता गस्ती दरम्यान अवैध रित्या वाहतुक होत असल्याचे आढळुन आल्याने ताब्यात घेतले आहे.

MH 26 AA 7869 क्रमांकाची पिकअप फुटाणा – बोरगाव/बा. – नकटी रोडने सुसाट वेगाने जाताना गस्तीवरील असलेल्या चिचगड पोलिस यांना दिसले. वाहनास थांबण्याचा इशारा केल्यानंतरही तो भरधाव निघाला. पोलिसांनी पिकअपचा पाठलाग सुरू केला. चिचगड पोलिसांनी सतर्कता दाखवत ताडपत्री झाकून असलेला हे पिकअप वाहन व वाहन चालक अखेर ताब्यात घेतला.

ट्रकमधे अवैध रित्या कोबुंन असलेले  तिन काळ्या रंगाच्या म्हशी व चारचाकी पिकअप वाहन असा 5 लक्ष 75 हजार रुपयांचा मुद्देमाल चिचगड पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक हेगडकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली असुन सर्व गोवंश गोरक्षणात पाठविण्यात आले.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें