चिचगड पोलिसांची मोठी कारवाई; सीमेवरून 20-25 गोवंश ताब्यात, तस्कर फरार

गोंदिया ( चिचगड ) : चिचगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आंतरराज्य गोवंश तस्करी करणाऱ्या टोळीच्या मनसुब्याला पोलिसांनी धक्का दिला आहे. छत्तीसगड सीमेवरून जंगल मार्गाने महाराष्ट्रात आणली जाणारी 20 ते 25 गोवंशाची जनावरे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. मात्र पोलीसांना पाहताच तस्कर जंगलात पळून गेल्याचा अंदाज वर्तविले जात आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार छत्तीसगड राज्यातील भाकुर्रा येथून गोवंशाची जनावरे नवाटोला मार्गे महाराष्ट्रात आणली जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे चिचगड पोलिस्टेसनचे ठाणेदार जनार्धन हेगडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने मौजा नवाटोला जंगल परिसरातील सीमावर्ती भागात सापळा रचला.

आज दि. 03 ऑगस्ट रोजी पथकाला पायी चालत 20 ते 25 गोवंश घेऊन जाण्याची माहीती मिळाली. माहिती मिळताच चिचगड पोलिसांना घटना स्थळा कडे धाव घेतला. पोलिसांची चाहूल लागताच जनावरे नेनारे  ते अज्ञात व्यक्ती जनावरे सोडून जंगलात पळून गेले. पोलिसांनी तात्काळ सर्व गोवंश ताब्यात घेतले.

ताब्यात घेण्यात आलेल्या गोवंशांना सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रकरणी अज्ञात इसमांविरुद्ध चिचगड पोलीस ठाण्यात कायदेशीर प्रक्रीया सुरु आहे. व फरार तस्करांचा शोध सुरू असल्याचे पोलीसांनी सांगितले. सीमाभागात गोवंश तस्करी रोखण्यासाठी अशीच धडक कारवाई सुरू राहणार असल्याचे चिचगड पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

error: Copy Is Not Allowed !!