देवरी पोलिसांची मोठी कारवाई: आमगाव रोडवर २३ लाख ६० हजारांचा अवैध जनावरांचा साठा जप्त; ट्रकचालक व मालकावर गुन्हा दाखल

गोंदिया ( देवरी ) : देवरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आमगाव रोडवरील लोहारा येथे पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान मोठी कारवाई केली आहे. अवैधपणे जनावरांची वाहतूक करणारा आयशर ट्रक अडवून पोलिसांनी सुमारे २३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी वाहन चालक व मालकाविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑक्टोबर २०२६ रोजी देवरी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी गस्तीवर असताना, आमगाव रोडवरील लोहारा येथे अवैधरीत्या जनावरांची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तेथे नाकाबंदी केली. यादरम्यान आमगाव बाजूकडून देवरीकडे येणाऱ्या आयशर कंपनीचा लाल रंगाचा ट्रक (क्र. CG 04 PK 3407) थांबवण्याचा इशारा करण्यात आला. 
पोलिसांनी वाहनाची व पंचांसमक्ष पाठीमागच्या डाल्याची पाहणी केली असता, त्यात १० मोठे म्हशी व २ मोठे बोदे (हले) असे एकूण १२ नग काळ्या रंगाचे जनावरे अत्यंत क्रूरपणे, कोणतीही खाण्या-पिण्याची व राहण्याची सोय न करता, मतेपेका जास्त कोंडून भरलेली आढळली. 
या प्रकरणी पोलिसांनी जनावरांसह एकूण २३ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

यात: ३ लाख ६० हजार रुपये किमतीची १२ नग जनावरे. 
२० लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक (क्र. CG 04 PK 3407). 

या प्रकरणी वाहन चालक आशिक मनहरन जोशी (वय २४ वर्षे, रा. पथरार्ड क्र. ५, भिलाई, छत्तीसगड) आणि वाहन मालक हिमांशु होरीलाल टंडन (वय २० वर्षे, रा. रिंगनी वार्ड क्र. २, भिलाई, छत्तीसगड) यांच्यावर प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध कायदा १९६० चे कलम ११(१) (ठ), (ई), (फ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेली सर्व जनावरे वैद्यकीय परीक्षणानंतर सुरक्षेसाठी गोशाळेत दाखल करण्यात आली असून, पुढील तपास देवरी पोलीस करत आहेत. 

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

error: Copy Is Not Allowed !!